शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

सांगली महापालिका क्षेत्रामध्ये विकासकामांना मनाई : आयुक्तांच्या परिपत्रकाने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 22:54 IST

सांगली महापालिका क्षेत्रातील पदाधिकारी व नगरसेवकांना त्यांच्या स्वेच्छा निधीतून विकासकामे मंजूर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीस अजूनही कालावधी असताना हा निर्णय

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाची सूचना; पदाधिकारी, नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर

सांगली : महापालिका क्षेत्रातील पदाधिकारी व नगरसेवकांना त्यांच्या स्वेच्छा निधीतून विकासकामे मंजूर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीस अजूनही कालावधी असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाच्या निर्देशानंतर आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना परिपत्रक काढले आहे. या निर्णयामुळे शहरात या पंधरवड्यात होऊ घातलेल्या विकासकामांना ब्रेक लागणार आहे. या निर्णयाचा महापौर हारुण शिकलगार यांनी निषेध केला.

स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या तीन महिने अगोदरपासून कोणत्याही लोकप्रतिनिधींना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील विकासकामांवर स्वेच्छा निधी खर्च करता येणार नाहीत. त्यामुळे निर्बंध लागू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी महापालिकेच्या सर्व खातेप्रमुखांना या आशयाचे परिपत्रक बजाविले आहे.

सर्व महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, गटनेते यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीच्या फायलींवर कोणताही निर्णय घेता येणार नाही. या निर्णयामुळे नगरसेवकांची सुमारे पन्नास कोटी रूपयांची विकासकामे आता ठप्प झाली आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपाच्या सर्व खातेप्रमुखांनी या फायलींवरील पुढील कार्यवाही थांबल्याने नगरसेवकांची चांगलीच गोची निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी रखडलेली कामे उरकण्यासाठी नगरसेवकांची धावपळ आता व्यर्थ ठरणार आहे.महापौर म्हणतात, वाहन स्वीकारणार नाही!पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता कालावधित महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करून घेण्यात आली होती. आता ही आचारसंहिता संपली तरी पदाधिकाºयांना वाहने व सीमकार्ड परत देण्यात आलेली नाहीत. यावर महापौर हारुण शिकलगार यांनी संताप व्यक्त केला. अपमान करून घेत वाहन घेण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे आता प्रशासनाने वाहन दिले तरी आपण ते स्वीकारणार नसल्याचे महापौरांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण