शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-मिरज रस्ता दिसायला देखणा, पण असुरक्षित आणि जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:00 IST

Accident Sangli- सांगली महापालिका क्षेत्रातील एकमेव सुस्थितीत असणारा सांगली-मिरज रस्ता आता सुरक्षित राहिलेला नाही. सार्वजनिक बांधकामच्या बेफिकिरीमुळे ठिकठिकाणी अपघातांचे ब्लॅक स्पॉट निर्माण झालेत. अपघात टाळण्यासाठी पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे, पण त्यासाठी तीस-पस्तीस लाखांच्या निधीलाही हा विभाग महाग झाला आहे.

ठळक मुद्देसांगली-मिरज रस्ता दिसायला देखणा, पण असुरक्षित आणि जीवघेणापट्टे झाले गायब, गतिरोधकांवर अनेकांनी गमावले प्राण, पीडब्ल्युडीच्या बेफिकिरीचे बळी

सांगली : महापालिका क्षेत्रातील एकमेव सुस्थितीत असणारा सांगली-मिरज रस्ता आता सुरक्षित राहिलेला नाही. सार्वजनिक बांधकामच्या बेफिकिरीमुळे ठिकठिकाणी अपघातांचे ब्लॅक स्पॉट निर्माण झालेत. अपघात टाळण्यासाठी पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे, पण त्यासाठी तीस-पस्तीस लाखांच्या निधीलाही हा विभाग महाग झाला आहे.पीडब्ल्युडीच्या बेफिकिरीने वर्ष-सहा महिन्यांत अनेकांचे बळी गेलेत. अशास्त्रीय पद्धतीच्या गतिरोधकांमुळे हकनाक प्राण गमवावे लागलेत. पीडब्ल्युडीच्या अन्य रस्त्यांकडे फारसे कुणी बघत नाही, पण सांगली-मिरज रस्ता सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्यांना त्याचे गांभीर्य नसल्याचे जाणवते. रस्त्यावरील पांढरे पट्टे गायब झाले आहेत. नव्याने मारण्याचे कोणतेच नियोजन पीडब्ल्युडीकडे नाही. गेल्या पावसाळ्यानंतर रस्त्याचे घिरडे झाले होते, दुरुस्तीला तीन-चार महिने लागले, तोपर्यंत सांगली-मिरजकरांना वनवास सोसावा लागला.गतिरोधकांवर पट्टे नसल्याने सर्वाधिक अपघात होत आहेत. जीएसटी कार्यालय, सिद्धिविनायक रुग्णालय, कृपामाई रुग्णालय, भारती रुग्णालय, वानलेसवाडी, विजयनगर, पोलीस अधीक्षक कार्यालय, बाजार समिती येथील गतिरोधक अत्यंत जीवघेणे आहेत. भारती रुग्णालयासमोरील गतिरोधकांना तर कोणताच शास्त्रीय ताळतंत्र नाही. गतिरोधकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ते समितीची परवानगी लागते, पण सांगली-मिरज रस्त्यावर गतिरोधक बनवणाऱ्या अधिकाऱ्यांना याची माहितीच नसावी असे दिसते.

सहा मार्गिकांचा हा रस्ता देखणा असला तरी तो आता सुरक्षित राहिलेला नाही. साईड पट्टे, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक व सिग्नलजवळील पट्टे, दुभाजक पट्टे नसल्याने वाहतूक अस्ताव्यस्त सुरू आहे. पट्ट्यांसाठी सुमारे तीस ते पस्तीस लाखांची गरज आहे, पण तो उपलब्ध करण्याची मानसिकता सार्वजनिक बांधकामकडे नाही. आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून गांधी चौकापासून भारती रुग्णालयापर्यंत हायमास्ट दिवे बसविले, पण दुरुस्तीअभावी सर्वत्र अंधार पसरला आहे.द्विवार्षिक निधीच्या उधळपट्टीचे परिणामया रस्त्यासाठीचा द्विवार्षिक निधी एकाच वर्षात संपविल्याचे परिणाम आता दिसू लागलेत. देखभाल-दुरुस्तीसाठी निधीच नसल्याने नागरिकांचा वनवास सुरू झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगली