शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

गणेशोत्सवासाठी सांगलीची बाजारपेठ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:03 AM

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गणरायाच्या आगमनाला एकच दिवस शिल्लक राहिल्याने सांगलीच्या बाजारपेठेत उत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. सांगलीच्या मारुती रोड, बालाजी चौक, हरभट रोडवर उत्सवासाठी लागणाºया साहित्याचे स्टॉल्स सजले असून उत्सवाच्या उत्साहाला आता बहर आला आहे.शुक्रवारी घरोघरी आणि मंडळांच्या गणपतीचे आगमन होणार असल्याने, गणेशमूर्ती विक्री स्टॉलना भेट ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गणरायाच्या आगमनाला एकच दिवस शिल्लक राहिल्याने सांगलीच्या बाजारपेठेत उत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. सांगलीच्या मारुती रोड, बालाजी चौक, हरभट रोडवर उत्सवासाठी लागणाºया साहित्याचे स्टॉल्स सजले असून उत्सवाच्या उत्साहाला आता बहर आला आहे.शुक्रवारी घरोघरी आणि मंडळांच्या गणपतीचे आगमन होणार असल्याने, गणेशमूर्ती विक्री स्टॉलना भेट देऊन मूर्तींचे बुकिंग सुरू आहे. शहरात सर्वत्रच गणेशमूर्ती विक्री होत असून, पुष्पराज चौकात साठहून अधिक स्टॉलवर मूर्ती उपलब्ध आहेत. मारुती रोड, स्टँड रोड, गावभाग याठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल्स् सजले आहेत. यंदा शाडूच्या मूर्तींनाही अधिक मागणी आहे. मागणीच्या तुलनेत यंदा शाडूच्या मूर्तींची संख्या कमी आहे. गतवर्षीही असाच तुटवडा जाणवत होता. सार्वजनिक मंडळांकडून सहा फुटापेक्षा जास्त किंवा बैठ्या, पण आकर्षक मूर्तीला पसंती मिळत आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मोठ्या मूर्तींचे बुकिंग पंधरा दिवस अगोदरच झाले आहे.गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्याने त्याच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. सांगलीच्या मारुती रोडवर रस्त्याच्या दुतर्फा आणि मध्यभागीही मोठ्या प्रमाणावर साहित्य विक्रीचे स्टॉल्स लागले आहेत. भाविकांचीही मोठी गर्दी याठिकाणी दिसत आहे. आरास साहित्य, धूप, अगरबत्तीसह पूजेचे साहित्य, फळे, तयार नैवेद्य, फुले अशा विविध वस्तूंचे स्टॉल्स याठिकाणी उपलब्ध आहेत. एकाचवेळी सर्व खरेदी करणे याठिकाणी शक्य असल्याने बुधवारी सकाळपासून मारुती रोडवर खरेदीसाठी गर्दी झाली होती.गणेशमूर्तींचे स्टॉल शहरातील प्रमुख बाजारपेठेसह विश्रामबाग, शंभरफुटी रस्ता, मारुती रोड, माळबंगला परिसर याठिकाणीही उभारण्यात आले आहेत. त्यात सर्वात जास्त साठहून अधिक स्टॉल पुष्पराज चौकात सांगली-मिरज रस्त्यावर उभारण्यात आले आहेत. हे स्टॉल स्थानिक मूर्तिकारांबरोबरच तासगाव, इचलकरंजी, कºहाडसह शेजारच्या कर्नाटकातील मूर्तिकारांचेही आहेत. राजस्थानी कलाकारांनीही शहराच्या विविध भागात मूर्तींचे स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलवर पारंपरिक पध्दतीच्या मूर्तींना मागणी आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिस आणि शाडूच्या मूर्ती तेथे उपलब्ध आहेत.फुलांना आला भावबाजारात बुधवारी झेंडू, शेवंतीची फुले ५0 रुपयांना पावकिलो या दराने म्हणजेच २00 रुपये किलो दराने विकली जात होती. पण फुलांची आवक कमी असून मागणी अधिक आहे. दर जास्त मिळत असल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.गणरायाच्या आगमनाचा मुहूर्तराहू काळात गणरायाची प्रतिष्ठापना टाळण्याचा सल्ला काही ठिकाणी दिला जात असताना, गणरायाच्या आगमनाला मुहूर्ताची आवश्यकता नसल्याचे अनेक ज्योतिष तज्ज्ञांकडून स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रतिष्ठापनेच्या मुहूर्ताबाबत वेगवेगळी मते दिसून येत आहेत.