शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

दुरंगी की तिरंगी लढतीवर ठरणार सांगलीचा भावी खासदार; मतदार संघाचे नवे राजकीय समीकरण काय?

By हणमंत पाटील | Updated: March 3, 2024 12:44 IST

सांगली लोकसभा हा १९६२ ते २०१४ पर्यंत कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, २०१४ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत कॉंग्रेसचे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला.

हणमंत पाटील सांगली : गत पंचवार्षिक सांगलीलोकसभानिवडणूक तिरंगी झाली होती. त्यामुळे कॉंग्रेसच्या मतांमध्ये विभाजन होऊन भाजपचे संजय पाटील यांचा विजय सोपा झाला. हीच खेळी भाजपकडून पुन्हा खेळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात दुरंगी लढत होणार की अपक्ष उमेदवार चंद्रहार पाटील रिंगणात उतरल्यास तिरंगी होणार आहे. यावर सांगलीचा भावी खासदार ठरण्याची शक्यता आहे. 

सांगली लोकसभा हा १९६२ ते २०१४ पर्यंत कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, २०१४ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत कॉंग्रेसचे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. पूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेले संजय पाटील हे ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून खासदार झाले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली. पूर्वाश्रमीचे भाजपचे असलेले गोपीचंद पडळकर यांनी ऐनवेळी वंचित बहुजन विकास आघाडीची उमेदवारी घेतली. कॉंग्रेसच्या मतात फूट पडल्याने त्यांना तीन लाखांहून अधिक मते मिळाली. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावरील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांचा पराभव होऊन संजय पाटील हे दुस-यांदा भाजपचे खासदार झाले. 

आगामी लोकसभा निवडणुकीत हॅट्रीक करण्याचे मनसुबे आखलेल्या खासदार पाटील यांनी मतदारसंघातील गावागावात आपला गट तयार केला आहे. परंतु, पक्षांतर्गत रोष रोखण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे पक्षाचे विद्यमान आमदार व पदाधिकारी उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच, पक्षश्रेष्ठींकडे उमेदवार बदलाची मागणी होत असलतरी खासदार पाटील यांना पर्याय देणारा तगडा उमेदवार भाजपकडे सध्यातरी नाही. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व दीपक शिंदे यांच्याकडून जिल्ह्यात दौरे सुरू आहेत. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार बदलायची की पुन्हा संजय पाटील यांनाच संधी द्यायची, या द्वीधामनस्थितीत पक्षाश्रेष्ठी आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकसभेच्या पहिल्या यादीत पाटील यांचे नाव नाही. विशाल पाटील यांना कॉंग्रेस की शिवसेनेची उमेदवारी ? गतपंचवार्षिक निवडणुकीतील विशाल पाटील यांच्या कॉग्रेसच्या उमेदवारीवरून शेवटपर्यंत गोंधळ सुरू होता. ऐनवेळी विशाल यांनी स्वाभिमानीची उमेदवारी घेतली.  कॉंग्रेसऐवजी स्वाभिमानीकडून लढल्याने कॉंग्रेसच्या हक्काच्या मतांपासून ते वंचित राहिले. कॉंग्रेसची काही मते वंचितचे उमेदवार पडळकर यांच्याकडे झुकल्याने भाजपची खेळी यशस्वी ठरली. आता कोल्हापूरची शिवसेनेची जागा शाहू छत्रपती यांना सोडून सांगलीची जागा शिवसेनेला देण्याची महाविकास आघाडीत चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या हक्काची सांगलीची जागा शिवसेनेला सोडावी लागली. तर विशाल हे कॉंग्रेसचे उमेदवार राहणार की शिवसेनेची उमेदवारी स्वीकारणार याविषयी उत्सुकता आहे. वंचित, स्वाभिमानीचा दावा...गतपंचवार्षिक निवडणुकीत कॉंग्रेसऐवजी स्वाभिमानीची उमेदवारी विशाल पाटील यांनी घेतली.  त्यामुळे या मतदारसंघावर स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शट्टी यांचा दावा आहे. तर दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे वंचितनेही महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर सांगली मतदारसंघावर दावा केला आहे. चंद्रहार यांची अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्यात भाजप यशस्वी झाला. तर गतवर्षांप्रमाणे पुन्हा एकदा तिरंगी लढत होऊ शकते. तिरंगी ऐवजी दुरंगी लढत होण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कस लागणार आहे. २०१९ च्या सांगली लोकसभेतील मतदान उमेदवार              पक्ष           मतदान १) संजय पाटील    भाजप         ५, ०८,९९५२) विशाल पाटील   स्वाभिमानी    ३,४४,६४३३) गोपीचंद पडळकर वंचित       ३,००,२३४सांगली लोकसभेतील विधानसभानिहाय मतदारमिरज : ३,१९,९९९सांगली : ३,३१, ६५२जत  : २,७९, ५२७खानापूर -आटपाडी : ३,३२,०५३पलूस-कडेगाव   : २,८३,००५तासगाव-कवठेमहांकाळ : २,९८,२२०एकूण मतदार : १८,४४, ४५६सांगली लोकसभेतील आमदार

भाजप :       २ कॉंग्रेस :       २ राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) : १ शिवसेना (शिंदे गट) : १

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा