शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : भाजप-काँग्रेसमध्ये सभेत खडाखडी; भाजपकडून काँग्रेसच्या आक्रमणाला प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:29 IST

सांगली महापालिकेतील नव्या सत्ताधारी भाजपच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही काँग्रेसच्या आक्रमणाला भाजपच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देभाजप-काँग्रेसमध्ये सभेत खडाखडीकाँग्रेसच्या आक्रमणाला भाजपकडून प्रत्युत्तर

सांगली : महापालिकेतील नव्या सत्ताधारी भाजपच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही काँग्रेसच्या आक्रमणाला भाजपच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

आरोप-प्रत्यारोपांची सलामी झडली असून, दोन्ही पक्षांतील नगरसेवकांत खडाखडी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. आरोग्य, डास, कचरा उठाव, पाण्यावरून काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर भाजपनेही त्यांना गेल्या पंधरा वर्षातील कारभाराचा जाब विचारत, आक्रमण परतवून लावले.महापालिकेतील भाजपच्या इनिंगला सोमवारी खऱ्याअर्थाने सुरूवात झाली. पहिलीच महासभा असल्याने नव्या सदस्यांनाही उत्सुकता होती. विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीनेही भाजपवर हल्लाबोल करण्याची संधी दवडली नाही. सभेच्या सुरूवातीलाच संविधान जाळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक गळ्यात फलक अडकवून व हातात संविधानाची प्रत घेऊन आले होते.

या घटनेचा निषेध करा, मगच सभा सुरू करा, असा पवित्रा काँग्र्रेस, राष्ट्रवादीने घेतला. त्यावरून दोन्ही बाजूचे नगरसेवक भिडले. अखेर महापौरांनी निषेधाचा ठराव घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले.या सभेच्या अजेंड्यावर स्वीकृत सदस्य, स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती, मागासवर्गीय समिती सदस्यांच्या निवडीचा विषय असतानाही, दोन्ही काँगे्रस पक्ष आरोग्य, डास, डेंग्यू, पाणी या विषयांवर चर्चा घडवून आणण्यात यशस्वी ठरले.

प्रारंभी महापौर संगीता खोत यांनी, विषयपत्रिकेवरील विषय संपल्यानंतर चर्चा करू, असे आवाहन केले. पण त्याला न जुमानता विरोधकांनी पहिल्या सभेतच बाजी मारली.विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी, शहरात प्रचंड डास झाले असून डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. औषध फवारणी होत नाही. काँग्रेस नगरसेविकेलाच रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर प्रशासनाने काय उपाययोजना केल्या? असा सवाल केला. त्यावर भाजपच्या भारती दिगडे यांनी, तुमचीच सत्ता होती, तुम्ही काय केले ते सांगा, असा पवित्रा घेतला. दिगडे यांच्या प्रश्नाला संजय मेंढे यांनी उत्तर देत, हा कुठल्या पक्षाचा विषय नाही. आम्ही भाजपला जाब विचारत नसून प्रशासनाने काय केले हे विचारत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली