शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : घराच्या उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविणे ठरणार अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 19:23 IST

ग्रामपंचायतीमध्ये गावातील, गावठाणमधील मिळकतीचे वर्णन नोंदवहीत केले जाते. त्या नोंदीचा ८ अ चा उताºयावर म्हणजेच जुन्या नोंद असलेल्या घरावर आजपर्यंत नागरिकांना कर्ज काढून बोजा चढविता येत होता. पण सरकारी आदेशाने यापुढे कोणत्याही बँकेच्या कर्जाचा बोजा ८ अ च्या नोंदवहीत चढविला जाणार नाही. आता घरावर बोजा चढविणे अवैध ठरणार आहे. त्यामुळे बिगरशेती धारक व सामान्य नागरिक हतबल झाले आहेत.

ठळक मुद्देघराच्या उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविणे ठरणार अवैधसरकारच्या आदेशाने नागरिक हतबलसामान्य नागरिक, बिगरशेती धारकांचे हाल

अतुल जाधव 

देवराष्ट्रे : ग्रामपंचायतीमध्ये गावातील, गावठाणमधील मिळकतीचे वर्णन नोंदवहीत केले जाते. त्या नोंदीचा ८ अ चा उताऱ्यावर म्हणजेच जुन्या नोंद असलेल्या घरावर आजपर्यंत नागरिकांना कर्ज काढून बोजा चढविता येत होता. पण सरकारी आदेशाने यापुढे कोणत्याही बँकेच्या कर्जाचा बोजा ८ अ च्या नोंदवहीत चढविला जाणार नाही. आता घरावर बोजा चढविणे अवैध ठरणार आहे. त्यामुळे बिगरशेती धारक व सामान्य नागरिक हतबल झाले आहेत.महाराष्ट्र शासनाने सर्व ग्रामपंचायतींना डिसेंबर २०१७ मधील दिलेल्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायत कायदा १९५८ अंतर्गत कर व फी कायद्यानुसार व १९६० च्या तरतुदीनुसार नंबर ८ मिळकतीवर कर्जाचा बोजा व इतर कोणताही बोजा नोंद करायची तरतूद नाही. नंबर ८ हा अभिलेख नसून कर आकारणी वही असल्याने यावर कोणताही बोजा अथवा भार नोंद करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याची अंमलबजावणी सर्व ग्रामपंचायतींमध्ये चालू झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल चालू झाले आहेत.अनेक नागरिक बिगरशेती जमीनधारक आहेत. तुकडेमोड कायद्यामुळे अनेक कुटुंबांच्या नावावर जमिनीची नोंद नाही. विभक्त कुटुंबियांना जमीन नाही. यासह ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची स्थावर मालमत्ता ही घरच असते. या घराची नोंद ८ अव्यतिरिक्त कुठेही नसते. त्यामुळे अडी-अडचणीत अचानक पैशाची गरज भासल्यास सहकारी पतपेढी, बँक यांचे कर्ज ८ अ मिळकतीवर घेऊन समस्या सोडविणे शक्य होते. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.८ अ उताऱ्यांवर कर्ज वाटप बंदसहकार विभागाने सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून सहकारी बँका, पंतसंस्था, पतपेढी यांना याबाबतच्या सूचना करुन लेखी आदेश दिल्यामुळे सर्व सहकारी कर्ज पुरवठा संस्थांनी ८ अ च्या मिळकतीवरील कर्ज वाटप बोजा नोंद होत नसल्यामुळे बंद केले आहे.बोजा कमी करण्याचे काम चालूसरकारी आदेश येण्याआधी ज्या ८ अ च्या मिळकतीवरील बोजा नोंद आहे, अशा नोंदी संबंधित बँक व पतसंस्थांच्या पत्राने कमी करण्याचे काम चालू आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीBanking Sectorबँकिंग क्षेत्र