शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळणे आवश्यक : रामदास आठवले, ७२ दांपत्यांना अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 15:38 IST

समाजातील जातीभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. समाजाची वैचारिक दिशा एकसंघ करण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देआंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळणे आवश्यक : आठवले

सांगली : समाजातील जातीभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. समाजाची वैचारिक दिशा एकसंघ करण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.जिल्हा परिषद सांगली येथील वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, समाज कल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती तम्मनगौडा रविपाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, माजी महापौर विवेक कांबळे, माजी उपमहापौर शेखर इनामदार, गोपीचंद पडळकर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे आदि मान्यवर उपस्थित होते.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत विवाहित जोडप्यांना 50 हजार रूपये अनुदान दिले जाते. आंतरजातीय विवाह केलेल्या अनेक जोडप्यांची उदाहरणे देवून समाजामध्ये परिवर्तन होत असल्याचे ते म्हणाले. आई-वडीलांनी मुलांनी घेतलेला निर्णय मान्य करून त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे.

सामाजिक ऐक्य व जातीभेद नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन द्यावे, असे सांगून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना शुभेच्छा दिल्या.स्वागत व प्रास्ताविक जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजनेबाबत व दिव्यांग नोंदणीबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्हा परिषद सांगलीच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ७२ आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांना समाजातील जातीभेद नष्ट करण्याच्या कामात महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल प्रत्येकी पन्नास हजार रूपये अनुदान अदा करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, समाज कल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांनी मनोगत व्यक्त करून आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनीही मनोगत व्यक्त करताना त्यांना आलेल्या अडचणींचा खुलासा केला.आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीकांत जोशी यांनी केले.या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, आंतरजातीय विवाह केलेले दांपत्य व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSangliसांगलीcollectorतहसीलदार