शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : मिरज शहरात येणाऱ्या जड वाहतुकीस सायंकाळी पाच तास प्रवेश मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 17:30 IST

मिरज शहरात जड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमिवर मिरज शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वाहतूक नियोजन 6 ते 20 मार्च 2018 पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. यानुसार मिरज शहरातील येणाऱ्या जड वाहतुकीस सायंकाळी 16.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत पाच तास प्रवेश मनाई करण्यात येत आहे.

ठळक मुद्देवाहन चालक व जनतेने हरकती व सूचना द्याव्यात : पोलीस अधीक्षक सुहेल शर्माप्रायोगिक तत्त्वावर जड वाहतुकीस 20 मार्चपर्यंत प्रवेश मनाई

सांगली : मिरज शहरात जड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमिवर मिरज शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वाहतूक नियोजन 6 ते 20 मार्च 2018 पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. यानुसार मिरज शहरातील येणाऱ्या जड वाहतुकीस सायंकाळी 16.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत पाच तास प्रवेश मनाई करण्यात येत आहे.वाहनचालक व जनतेने नमूद केलेल्या वाहतूक नियोजनास सहकार्य करावे. तसेच आपल्या हरकती, सूचना असल्यास पाठवाव्यात, जेणेकरून प्राप्त सूचनांचे अवलोकन केल्यानंंतर वाहतूक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील, असे आवाहन पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले आहे.तासगाव, सोलापूर, पंढरपूरवरून कर्नाटक, शिरोळ, कोल्हापूरकडे जाणारी जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 16.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत प्रवेश मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे

1) कर्नाटक जाणारा रस्ता - तासगाव फाटा - सुभाषनगर - टाकळी रोड - बोलवाड फाटा - बेडग रोड - विजयनगर - म्हैशाळ 2) शिरोळकडे जाणारा रस्ता - तासगाव फाटा - सुभाषनगर - टाकळी रोड - बोलवाड फाटा - बेडग रोड - कत्तलखाना - म्हैसाळ उड्डाण पूल - शास्त्री चौक - कृष्णा घाट - अर्जुनवाड - शिरोळ 3) कोल्हापूरकडे जाणारा रस्ता - तासगाव फाटा - सुभाषनगर - टाकळी रोड - बोलवाड फाटा - बेडग रोड - कत्तलखाना - म्हैसाळ उड्डाण पूल - शास्त्री चौक - म. फुले चौक - अंकली फाटा.

कर्नाटक, म्हैसाळकडून मिरज शहरात जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 16.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत प्रवेश मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे -1) सांगलीकडे जाणारा रस्ता - म्हैसाळ - विजयनगर - बेडग आडवा रस्ता - टाकळी रोड - सुभाषनगर - तासगाव फाटा - गांधी चौक - सांगली 2) कोल्हापूरकडे जाणारा रस्ता - म्हैसाळ - म्हैसाळ उड्डाण पूल - शास्त्री चौक - म. फुले चौक - अंकली फाटा. 3) तासगाव, पंढरपूर, सोलापूरकडे जाणारा रस्ता - म्हैसाळ - विजयनगर - बेडग आडवा रस्ता - टाकळी रोड - सुभाषनगर - तासगाव फाटा.अंकली फाट्यावरून मिरज शहरात जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 16.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत प्रवेश मनाई करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे - तासगाव, पंढरपूर, सोलापूरकडे जाणारा रस्ता - अंकली फाटा - शास्त्री चौक - म्हैसाळ उड्डाण पूल - बेडग आडवा रस्ता - टाकळी रोड - सुभाषनगर - तासगाव फाटा.सुभाषनगर येथून मिरज शहरात जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 16.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत प्रवेश मनाई करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे - 1) सांगलीकडे जाणारा रस्ता - सुभाषागर - तासगाव फाटा - गांधी चौक - सांगली. 2) कर्नाटककडे जाणारा रस्ता - सुभाषागर - टाकळी रोड - बोलवाड फाटा - बेडग रोड - विजयनगर - म्हैसाळ 3) शिरोळ व कोल्हापूरकडे जाणारा रस्ता - सुभाषागर - टाकळी रोड - बोलवाड फाटा - बेडग रोड - कत्तलखाना - म्हैसाळ उड्डाण पूल - शास्त्री चौक.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसSangliसांगली