शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : पत्नीवर खुनीहल्ला करुन पतीची आत्महत्या, भांबर्डेतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:45 IST

कौटूंबिक वादातून भांबर्डे (ता. खानापूर) येथे पत्नी सुजाता विजय बाबर (वय ४०) हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय जयसिंग बाबर (४५) असे मृत पतीचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देपत्नीवर खुनीहल्ला करुन पतीची आत्महत्या, भांबर्डेतील घटना पत्नीची प्रकूती गंभीर; कऱ्हाडमध्ये उपचार सुरु

विटा : कौटूंबिक वादातून भांबर्डे (ता. खानापूर) येथे पत्नी सुजाता विजय बाबर (वय ४०) हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय जयसिंग बाबर (४५) असे मृत पतीचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.हल्ल्यात जखमी झालेल्या सुजाता बाबर यांच्यावर कऱ्हाड (जि. सातारा) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या अजूनही बेशुद्ध असल्याने पोलिसांना त्यांचा जबाब घेता आलेला नाही. त्यामुळे हल्ल्याचे निश्चित कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.विजय बाबर यांचे सांगोले (ता. खानापूर) मूळ गाव आहे. गेल्या पाच वर्षापासून ती भांबर्डे येथे सासरी राहत होते. त्यांना मुलगा व मुलगी आहे. मुलीचे लग्न झाले आहे, तर मुलगा परराज्यात गलई व्यवसाय करतो. घरी बाबर दाम्पत्यच राहत होते.

गेल्या काही वर्षापासून बाबर हा मानसिक आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी रात्री या दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला.

या वादातून विजय बाबर याने पत्नी सुजाता यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्या काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यानंतर विजयने स्वत: राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विटा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Crimeगुन्हाSangliसांगली