शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत डोक्यात लोखंडी रॉड घालून तरुणाचा खून, वृद्धा जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 14:27 IST

सांगलीत आपटा पोलीस चौकी समोरील श्री अपार्टमेंटमध्ये हितेश उर्फ टिल्लूभाई जयंतीलाल पारेख (वय ४५) यांचा डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून करण्यात आल्या. तर त्यांची आई कमलाबेन पारेख (वय ८१) यांच्यावर हल्ला करण्यात आला. खूनाची ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

ठळक मुद्देडोक्यात लोखंडी रॉड घालून तरुणाचा खून, वृद्धा जखमी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण

सांगली : सांगलीत आपटा पोलीस चौकी समोरील श्री अपार्टमेंटमध्ये हितेश उर्फ टिल्लूभाई जयंतीलाल पारेख (वय ४५) यांचा डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून करण्यात आल्या. तर त्यांची आई कमलाबेन पारेख (वय ८१) यांच्यावर हल्ला करण्यात आला. खूनाची ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.आपटा पोलिस चौकीसमोरील श्री अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर प्लॅट नंबर पाचमध्ये हितेश हा आई कमलाबेनसह रहात होता. तो एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो. मध्यरात्रीच्या सुमारास पारेख यांच्या फ्लॅट मध्ये खुनाचा प्रकार घडला.

यामध्ये हितेश पारेख यांच्या डोक्यात रॉड घालून खून करण्यात आला, तर कमलाबेन यांच्यावर हल्ला करण्यात आला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. बुधवारी सकाळी दहा वाजता कमलाबेनचा दुसरा मुलगा महेश हा त्यांच्या घरी आला असता हा प्रकार उघडकीस आला.त्याने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक पोमण यांनी घटनास्थळी धाव घेतली. हितेश व कमलाबेन यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख शशिकांत बोराटे, उपअधिक्षक अशोक वीरकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.

पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. श्वानपथक अपार्टमेंटच्या सभोवतीच घुटमळले. या घटनेची माहिती मिळताच श्री अपार्टमेंटच्या आवारात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीMurderखून