शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मधुमेहापेक्षा रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 14:05 IST

राज्य शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात २४५ पथकांद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, यात मधुमेहापेक्षा रक्तदाबाचेच अधिक रुग्ण आढळून आले आहेत; तर कोरोनाच्या २७४ संशयित रुग्णांची तातडीने चाचणीसाठी शिफारस करण्यात आली. त्यात ४२ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देसांगलीत मधुमेहापेक्षा रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण मोठेकोरोनाचे २७४ संशयित : माझे कुटुंब, माझी जबाबदारी सर्वेक्षण

शीतल पाटील सांगली : राज्य शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात २४५ पथकांद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, यात मधुमेहापेक्षा रक्तदाबाचेच अधिक रुग्ण आढळून आले आहेत; तर कोरोनाच्या २७४ संशयित रुग्णांची तातडीने चाचणीसाठी शिफारस करण्यात आली. त्यात ४२ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, शासनाने प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान हाती घेतले आहे.

महापालिका क्षेत्रात या अभियानाला सुरुवात झाली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नियोजनाखाली २४५ पथके कार्यरत आहेत. यात आशा वर्कर्स, शिक्षकांसह स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त शहा यांच्याकडे या अभियानाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांची जवळपास साडेपाच लाख लोकसंख्या आहे, तर एकूण १ लाख २२ हजार कुटुंबे आहेत. गेल्या आठ दिवसांत ३० हजार कुटुंबांतील एक लाख ३० हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यात मधुमेह, रक्तदाब व इतर आजारांची माहिती घेण्यात आली. या सर्वेक्षणात रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण मधुमेहापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. तपासणीत ताप, खोकला या कोरोनासदृश २७४ रुग्ण आढळून आले.या रुग्णांना तातडीने कोरोना चाचणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यापैकी ४२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अभियानाची पहिली फेरी १० आॅक्टोबरला संपणार आहे. तत्पूर्वीच महापालिका क्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण होईल, असे डॉ. शहा यांनी सांगितले.महापालिका क्षेत्राचा आढावा

  • एकूण कुटुंबे : १ लाख २२ हजार
  • एकूण लोकसंख्या : ५ लाख ५० हजार
  • आजअखेर सर्वेक्षण (घरे) : ३०, २३१
  • आजअखेर तपासणी : १,३०,४९८
  • मधुमेह रुग्ण : २६३३
  • रक्तदाबाचे रुग्ण : ४२८३
  • इतर आजार : २९३
  • कोरोना संशयित : २७४
  • पॉझिटिव्ह : ४२
टॅग्स :Medicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलdiabetesमधुमेहSangliसांगली