शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सांगली : डोंगरी विभाग विकास कार्यक्रम : अपूर्ण कामे डिसेंबरअखेर पूर्ण करा : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:52 IST

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत उर्वरित सर्व कामे डिसेंबरअखेर कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.

ठळक मुद्देडोंगरी विभाग विकास कार्यक्रम :अपूर्ण कामे डिसेंबरअखेर पूर्ण करा : सुभाष देशमुखडोंगरी विभाग विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

सांगली : डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी बांधकाम, प्राथमिक शिक्षण, बंधारे व जलसिंचनाची कामे, रस्ते विकास, पाणीपुरवठ्याची कामे व अन्य मूलभूत सुविधांची कामे केली जातात. या कामांसाठी सन 2017-18 मध्ये दोन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला.

अनुदान वितरण प्रणाली (बी. डी. एस.) प्रमाणे तो खर्चही झाला आहे. या निधीतून मंजूर 24 कामांपैकी 9 कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित सर्व कामे डिसेंबरअखेर कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित डोंगरी विभाग विकास कार्यक्रम सन 2018-19 जिल्हास्तरीय समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश खाडे, आमदार मोहनराव कदम, आमदार विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांच्यासह अन्य संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या डोंगरी क्षेत्रात संपूर्ण शिराळा तालुका, कडेगाव तालुक्यातील कोतवडे, सोनसळ, शिरसगाव आणि सोनकिरे ही चार गावे तसेत खानापूर तालुक्यातील देविखिंडी, रेणावी, वासुंबे, कुर्ली आणि पारे ही पाच गावे येतात. या गावांमध्ये डोंगरी विभाग विकास कार्यक्रमासाठी अनुज्ञेय निधीपैकी 25 टक्के निधी अंगणवाडी कामांसाठी राखीव ठेवला जातो. तसेच, प्राथमिक शिक्षण, बंधारे व जलसिंचनाची कामे, रस्ते विकास, पाणीपुरवठ्याची कामे व अन्य मूलभूत सुविधांची कामे केली जातात.पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत चालू आर्थिक वर्ष सन 2018-19 साठीही 2 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 कोटी 40 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे.

या निधीमधून आमदार शिवाजीराव नाईक, आमदार शिवाजीराव देशमुख, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, आमदार विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी विविध कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र, उपलब्ध निधीच्या प्रमाणात सर्व लोकप्रतिनिधींनी कामांचा प्राधान्यक्रम द्यावा. तसेच ही कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी स्वागत केले. तसेच, डोंगरी विकास कार्यक्रमाची माहिती विषद केली. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी गत वर्षीच्या कामांचा आढावा घतला. यावेळी सहायक नियोजन अधिकारी डी. एस. पवार आणि ए. बी. पाटील, लेखाधिकारी एस. आर. पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी