शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Sangli: माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी तोडले व्यायामशाळेचे कुलूप, महापालिकेविरोधात आंदोलनाचा इशारा

By अविनाश कोळी | Updated: July 21, 2024 20:27 IST

Sangli News: खासदार फंडातून उभारलेली शिवाजी हौसिंग सोसायटीमधील व्यायामशाळा एका व्यक्तीने बळकावली होती. याविरोधात नागरिकांचा संताप व्यक्त होत असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी नागरिकांना सोबत घेऊन व्यायामशाळेचे कुलूप तोडले.

- अविनाश कोळी सांगली -  खासदार फंडातून उभारलेली शिवाजी हौसिंग सोसायटीमधील व्यायामशाळा एका व्यक्तीने बळकावली होती. याविरोधात नागरिकांचा संताप व्यक्त होत असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी नागरिकांना सोबत घेऊन व्यायामशाळेचे कुलूप तोडले. ही व्यायामशाळा पुन्हा नागरिकांच्या ताब्यात दिली. याच परिसरात ऑक्सिजन पार्कमध्ये सुरु असलेले अवैध धंदे व अश्लील चाळे यांचा बंदोबस्त महापालिकेने न केल्यास आंदोलनाचा इशाराही पाटील यांनी दिला.

काँग्रेसचे खासदार विशाल पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या घरामागे असलेल्या शिवाजी हौसिंग सोसायटीमधील खुल्या भूखंडावर खासदार फंडातून व्यायाम शाळा उभारण्यात आली आहे. एका व्यक्तिने ती बळकावली होती. त्या व्यायामशाळेचे कुलूप प्रतिक पाटील यांनी तोडून याची मालकी पुन्हा नागरिकांकडे दिली. तर या भूखंडावर ऑक्सिजन पार्क उभारला आहे, यामध्ये अश्लिल चाळे, दारू-गांज्या, मटणाच्या पार्ट्यांसह गैरप्रकार चालत आहेत. याचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिवाजी हौसिंग सोसायटीचा खुला भूखंड लहान मुलांना खेळण्यासाठी होता. त्यामुळे या भागातील नागरिकांनी या परिसरातील व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी तत्कालिन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्याकडे केली होती. प्रतीक पाटील यांनी खासदार फंडातून या ठिकाणी व्यायामशाळा सुरू केली होती. या भागातील तरूण नियमित व्यायाम करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी एका व्यक्तिने या व्यायामशाळेचा बेकायदेशीर ताबा घेतला. त्यामुळे नागरिकांना व्यायामशाळेत जाता येत नव्हते. रविवारी या परिसरातील नागरिकांनी प्रतीक पाटील यांना भेटून याबाबत तक्रार केली. त्यांनी नागरिकांसह येथे धाव घेत व्यायामशाळेचे कुलूप तोडले.

महिलांच्या तक्रारींची दखल घ्यानागरिकांना विश्वासात न घेता महापालिकेने येथील भुखंडावर ऑक्सिजन पार्क सुरू केले आहे. वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मात्र हा गैरप्रकाराचा अड्डा बनला आहे. दिवस-रात्र तळीराम येथे दारू पित असतात. गांजा ओढणाऱ्यांचाही वावर असतो. त्यामुळे नागरिकांनी येथे फिरणे कठीण झाले आहे. 

महापालिकेविरुद्ध संतापऑक्सिजन पार्कमधील अश्लील प्रकाराबाबत येथील महिलांनी तक्रारी केल्या आहेत. खुल्या भूखंडावरील गैप्रकार रोखावा, अन्यथा मनपाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा प्रतीक पाटील व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगली