शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

सांगली : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबांच्या पुतळ्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 17:26 IST

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीस शासनाने मंजुरी दिली होती. त्यापाठोपाठ पणन संचालकांनी पुतळा उभारणीच्या खर्चाला सोमवारी मान्यता दिली.

ठळक मुद्देमाजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबांच्या पुतळ्यास मंजुरीबाजार समितीत उभारणी : निधीस मान्यता

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीस शासनाने मंजुरी दिली होती. त्यापाठोपाठ पणन संचालकांनी पुतळा उभारणीच्या खर्चाला सोमवारी मान्यता दिली. त्यामुळे लवकरच पुतळ्याचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती रवी पाटील आणि संचालक अजित जाधव यांनी दिली.तासगाव बाजार समितीचा लौकिक राज्यभर पोहोचवण्यात आणि देशभरात बेदाणा मार्केटमध्ये तासगावचे नाव करण्यात आबांचे मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर बाजार समितीच्या आवारात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव बाजार समितीतर्फे २५ जानेवारी २०१७ रोजी करण्यात आला होता. त्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.शासनाकडून ४ आॅगस्ट रोजी पुतळा उभारणीस मंजुरी दिली. त्यानंतर पुतळा उभारणीसाठीच्या खर्चास परवानगी मिळण्याबाबत पणन संचालकांकडे प्रस्ताव सादर केला होता. सोमवारी पणन संचालकांकडून २९ लाख ३ हजार ९६८ रुपये खर्चास मंजुरी देण्यात आल्याची माहिती सभापती पाटील आणि संचालक जाधव यांनी दिली.

आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्या प्रयत्नामुळे आणि संचालक मंडळाच्या पाठपुराव्यामुळे पुतळा उभारणीसाठी आवश्यक ती सर्व मंजुरी मिळाली असून लवकरच पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती यावेळी दिली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSangliसांगली