शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : कृष्णा खोऱ्याचे कार्यक्षेत्र विस्तारणार : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 17:14 IST

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारणार असून, या महामंडळामार्फत पाणी व पीक व्यवस्थापनाद्वारे सहा जिल्ह्यांच्या विकासाचे मॉडेल तयार केले जात आहे. केंद्रीय नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

ठळक मुद्दे कृष्णा खोऱ्याचे कार्यक्षेत्र विस्तारणार : संजयकाका पाटीलनीती आयोगानुसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू

सांगली : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारणार असून, या महामंडळामार्फत पाणी व पीक व्यवस्थापनाद्वारे सहा जिल्ह्यांच्या विकासाचे मॉडेल तयार केले जात आहे. केंद्रीय नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.पाटील म्हणाले की, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर आदी जिल्ह्यातील ७४ तालुक्यांतील शेती, दुग्ध व्यवसाय, सिंचन, शेतीमाल प्रक्रिया उद्योग अशा विविध स्तरावर एकात्मिक विकास करण्याचा प्रयत्न आहे.

नीती आयोग, केंद्रीय कृषी मंत्रालय, प्रधानमंत्री सिंचन योजना आणि त्यांना पूरक ठरणारे विविध विभाग या सर्वांच्या सहकार्याने त्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे.

केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. कृषी सिंचन आणि पाणी व्यवस्थापन हा यातील महत्त्वाचा घटक आहे. त्यात ठिबक पद्धतीवर भर दिला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जास्तीत-जास्त वापर करता येईल.कृष्णा खोरेअंतर्गत ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेतून आतापर्यंत २ लाख २९ हजार २०३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

या तीनही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास आणखी ७४ हजार ५८८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल; तर सूक्ष्म सिंचनाद्वारे एक लाख ५४ हजार ६१५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. त्यासाठी सूक्ष्म सिंचनाचा शाश्वत पर्याय देण्याचा विचार नीती आयोगाने केला आहे.

शेतीपूरक दुग्ध व्यवसायालाही आधुनिकतेची जोड देऊन उत्पादन वाढ व शेतकºयांना अधिक लाभ कसा देता येईल, याचा विचार सुरू आहे. शेतीमालावर प्रक्रिया करून उपपदार्थ निर्मिती करून त्याचे मार्केटिंग करायचे आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याची अशी संकल्पना आहे.प्रत्येक गावातील जमीन क्षेत्रानुसार शेतकऱ्यांचे विकास गट तयार करण्यात येणार आहेत. एक हजारपासून पाच हजार एकरापर्यंत जमिनीचा एकात्मिक पद्धतीने विकास करता येईल. विकास सोसायट्यांना नाबार्डकडून थेट पतपुरवठा करून शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे पाटील म्हणाले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगली