शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : आठ वर्षापासून फरारी वॉन्टेड भावश्या पाटील पंढरपुरात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:28 IST

खून, खुनाचा प्रयत्न असे अर्धा डझनहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (वय ३७, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) यास पंढरपूर (जि. सोलापूर) येथे पकडण्यात गुंडाविरोधी पथकाला शुक्रवारी पहाटे यश आले. गेल्या आठ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत तो फरारी होता.

ठळक मुद्देआठ वर्षापासून फरारी वॉन्टेड भावश्या पाटील पंढरपुरात जेरबंदपोलिसांना गुंगारा : तीन खुनासह अर्धा डझनहून अधिक गुन्हे

सांगली : खून, खुनाचा प्रयत्न असे अर्धा डझनहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (वय ३७, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) यास पंढरपूर (जि. सोलापूर) येथे पकडण्यात गुंडाविरोधी पथकाला शुक्रवारी पहाटे यश आले. गेल्या आठ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत तो फरारी होता.विट्यातील गुंड संजय कांबळे याचा खून केल्यानंतर भावश्या चर्चेत आला. तत्पूर्वी त्याने पूर्ववैमनस्यातून रेठरेधरणमधील धनाजी मोहन पाटील यांचा खून केला होता. या दोन्ही खुनाच्या घटनेनंतर तो फरारी झाला होता. अनेक वर्षे त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता.

तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख बाळासाहेब वाघमोडे यांच्या पथकाने त्यास परराज्यात पकडले होते. त्याला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आठ वर्षापूर्वी खून खटल्याच्या सुनावणीला त्याला इस्लामपूर न्यायालयात नेण्यात येत होते. त्यावेळी त्याने पोलिसांना हिसडा मारुन न्यायालय इमारतीवरुन उडी घेऊन पलायन केले होते. तेंव्हापासून तो फरारीच राहिला.

फरारी काळात १ डिसेंबर २०१६ रोजी रेठरेधरणमध्ये येऊन संताजी खंडागळे-पाटील यांचा घरात घुसून खून केला होता. त्यांच्या पत्नीवर खुनी हल्ला केला होता. या घटनेनंतर हवेत गोळीबार करुन भावश्या, भावश्या, असे ओरडत तो पळून गेला होता.संताजी खंडागळे-पाटील यांचा फरारी काळात खून करुन भावश्याने पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले होते. या खूनप्रकरणी भावश्याच्या पुण्यातील दोन साथीदारांना अटक करण्यात यश आले होते. त्यांच्याकडूनही भावश्याचा ठावठिकाणा मिळाला नव्हता.

स्थानिक गुन्हे अन्वेषणची टिमही त्याच्या मागावर होती. पण त्यांना सुगावा लागत नव्हता. तो पंढरपूर येथे आश्रयाला असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती. पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डोके यांनी भावश्याला शिताफीने पकडले.गुन्ह्यांची मालिकाअत्यंत खूनशी आणि धिप्पाड यष्टी असलेल्या भावश्याने गेल्या दहा वर्षात वाळवा तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड दबदबा निर्माण केला होता. त्याला कोणतेही व्यसन नाही. मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह करतो. एकाठिकाणी जास्त दिवस राहणेही टाळतो. त्यामुळेच तो गेली आठ वर्षे पोलिसांना गुंगारा देत फरारी होण्यात यशस्वी झाला. तीन खून, खुनाचा प्रयत्न, पोलिसांच्या ताब्यातून पळण जाणे, सरकारी कामात अडथळा, बेकायदा शस्त्र बाळगणे, असे गुन्हे त्याच्याविरुद्ध नोंद आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हा