सांगली : दहावीच्या परीक्षेचा सांगली जिल्ह्याचा निकाल ९६.०९ टक्के लागला. उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. ९८.०३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. कोल्हापूर विभागात सांगली तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ०.५७ टक्क्यांनी घट झाली आहे.जिल्ह्यात ६५२ माध्यमिक शाळांतील ३८ हजार ४९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३६ हजार ९८९ जण उत्तीर्ण झाले. १७ हजार ८३० मुलींनी परीक्षा दिली. त्यामधून १७ हजार ४७९ उत्तीर्ण झाल्या. २० हजार ६६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १९ हजार ५१० उत्तीर्ण झाले.
मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाणे ३.६१ टक्क्यांनी जास्त आहे. पलूस तालुक्याने सर्वाधिक ९८.१० टक्के निकालासह बाजी मारली. सर्वात कमी ९२.९३ टक्के निकाल जतचा लागला आहे.