शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :जिल्ह्यात शाळा सिध्दी उपक्रमांतर्गत बाराशे शाळा अ श्रेणीत, यादी प्रसिध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 13:25 IST

शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून शाळा सिध्दी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक दोन हजार ९८३ शाळांपैकी एक हजार २३९ शाळांना  अ श्रेणी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील ९८३ शाळांपैकी एक हजार २३९ शाळांना अ श्रेणी शाळा सिध्दी उपक्रमांतर्गत बाराशे शाळांची यादी प्रसिध्दजिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचा समावेशमुलांना सर्वोत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी शाळांची गुणवत्ता प्रामाणित करण्यासाठी शाळा सिध्दी उपक्रम

सांगली : शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून शाळा सिध्दी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक दोन हजार ९८३ शाळांपैकी एक हजार २३९ शाळांना  अ श्रेणी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.मुलांना सर्वोत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी शाळांची गुणवत्ता प्रामाणित करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाचा शाळा सिध्दी उपक्रम राज्यात सुरू केला आहे. याबाबतचा शासन निर्णय ३० मार्च २०१६ रोजी घेण्यात आला होता.या कार्यक्रमांतर्गत शाळांना शाळा सिध्दीच्या संकेस्थळावर स्वयंमूल्यमापनविषयक माहिती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शाळांनी आपले स्वयंमूल्यमापन हे शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या एकमताने पूर्ण करावयाचे होते.

२०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यातील दोन हजार ९८३ शाळांची आॅनलाईन माहिती भरण्यात आली होती. त्या स्वयंमूल्यमापन केलेल्या माहितीनुसार श्रेणीनुसार मूल्यमापन करून प्रत्येक शाळेला ग्रेड दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळांपैकी एक हजार २३९ शाळांना अ श्रेणी मिळाली.

शाळा सिध्दी शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थी उपस्थिती, प्रगत शाळा, लोकसहभाग, डिजिटल माध्यमांचा वापर, शाळाबाह्य बालके, प्रत्यक्ष प्रवेशित बालकांची संख्या, विषयानुसार ज्ञानरचनावादी साहित्य, शालेय परिसर, क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, माध्यान्ह भोजन, स्वयंपाकगृह व भांडी, पेयजल, हात धुण्याच्या सुविधा, शौचालय, अध्यापनाचे नियोजन, वर्ग व्यवस्थापन, शिक्षकांची उपस्थिती यासारखे निकष घालून त्यांना स्वयंमूल्यांकन देण्यात आले आहे.

यापूर्वी उपक्रमशील शाळा लोकसहभागातून विविध उपक्रम राबवित होते. त्या माध्यमातून शाळांना आयएसओ मानांकन दिले जायचे. जिल्ह्यातील सर्वाधिक आयएसओ शाळा खानापूर तालुक्यातील होत्या. मात्र शाळा सिध्दी उपक्रमांतर्गत सर्वाधिक अ श्रेणी ग्रेड मिळविलेल्या शाळा जत तालुक्यातील आहेत. जत तालुक्यातील २११ शाळांचा समावेश आहे. त्यानंतर तासगाव तालुक्यात १७९ शाळा अ श्रेणीत आहेत.शाळा सिध्दीतील अ श्रेणीतील शाळा...शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत आटपाडी तालुक्यातील ९६, जत २११, कवठेमहांकाळ ७५, खानापूर ९६, मिरज १४४, पलूस ८७, शिराळा ६७, तासगाव १७९, वाळवा १५४, कडेगाव ७९ आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील ८१ शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :SchoolशाळाSangliसांगली