शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

सांगली जिल्ह्यात लवकरच चिकित्सा-व्यसनमुक्ती केंद्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:59 IST

अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर उपचार

सांगली : अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर उपचारासाठी कायम स्वरूपी चिकित्सा व व्यसनमुक्ती केंद्र लवकरच सुरू करत आहोत अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.पोलिस परेड क्रीडांगणावर महाराष्ट्र दिनाच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, पद्मश्री डॉ. विजयकुमार शाह आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, अमली पदार्थ विरोधी कारवाई, प्रबोधन व व्यसनमुक्ती यांच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या संकटाचे लवकरच समूळ उच्चाटन होईल. पालकमंत्री पदी नियुक्ती झाली, तेव्हा अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे आव्हान उभे होते. परंतु टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्वांनी एकजुटीने काम केले. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात अमली पदार्थ विरोधी एकूण ४१ गुन्हे दाखल झाले.त्यामध्ये ६२ आरोपींना अटक करून जवळपास ३० कोटी रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात यश आले. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर उपचारासाठी कायम स्वरूपी चिकित्सा व व्यसनमुक्ती केंद्र लवकरच सुरू करत आहोत. प्रजासत्ताक दिनी जाहीर केल्याप्रमाणे खबऱ्यांना बक्षीस ही देण्यात येत आहे.ते म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून सांगली व मिरजेच्या शासकीय रूग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामुग्री व सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभागासाठी लॅप्राॅस्कोपिक मशीन सुरू केले आहे. शासकीय रूग्णालयात चार हजारहून अधिक प्रसूती व दीड हजारहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या.

खेळाडू, पोलिस आदींचा सन्मानशिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित जिल्ह्यातील पाच खेळाडू, राष्ट्रपती पदकाने सन्मानित महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे फायरमन कासाप्पा माने, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गौरवलेले महानगरपालिकेचे सुनील माळी, बाबूराव कोळी आणि राजेंद्र कदम, पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित सहा अंमलदारांचे पालकमंत्री पाटील यांनी अभिनंदन केले.

या संस्थांचे अभिनंदनमहिला व बाल विकास विभागाअंतर्गत दादुकाका भिडे मुलांचे निरीक्षणगृह या संस्थेस उत्कृष्ट निरीक्षण गृह तसेच भगिनी निवेदिना प्रतिष्ठान संचलित मुलींच्या बालगृहास बालस्नेही पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेतील निकिता अभ्यंकर ही परिचारिका पदावर रायगड येथे, दिलासा भवन मिरजेतील प्रथमेश चौगुले याची कर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

अपंग जवानास मदतजम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अति उंच भागात कर्तव्य पार पाडताना दोन्ही पायांना हिमबाधा झाल्याने अपंगत्व आलेले जवान धाकरेश बापू जाधव यांना सैनिक कल्याण विभागातून वीस लाखांची आर्थिक मदत पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते दिली.

टॅग्स :Sangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटीलguardian ministerपालक मंत्री