शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्णबधिरांवरील शस्त्रक्रियांमध्ये सांगली राज्यात अव्वल, तब्बल १३ कोटींच्या शस्त्रक्रिया मोफत

By संतोष भिसे | Updated: November 28, 2022 17:17 IST

शस्त्रक्रियेसाठी दोन वर्षांपर्यंतची बालके पात्र आहेत. आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटलांच्या विनंतीनंतर वयोमर्यादेत वाढ

सांगली : कर्णबधिरांवरील शस्त्रक्रियांमध्ये (काँक्लियर इम्प्लांट) जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. शस्त्रक्रियेनंतरच्या थेरेपीमध्येही सातत्य यामुळे रुग्णांना वाचा मिळाली आहे. आरोग्य विभागाने सरकारी साच्यात काम करूनही समाजोपयोगी उपक्रम यशस्वी केला आहे.ऐकू न येणाऱ्यांवर काँक्लिअर इम्प्लांट ही महागडी शस्त्रक्रिया केली जाते. तिचा खर्च सुमारे १० ते १५ लाख रुपये आहे. अवाढव्य खर्चामुळे सर्वसामान्य पालक शस्त्रक्रिया टाळतात. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमासारख्या आरोग्यविषयक उपक्रमांतून अशा पालकांना दिलासा मिळाला आहे. एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. सरकारी तरतूद व सामाजिक संस्थांच्या मदतीतून खर्च होतो.राज्यात सर्वाधिक १३० बालकांच्या शस्त्रक्रिया सांगली जिल्ह्यात झाल्या आहे. राज्यभरातील २४० शस्त्रक्रियांच्या पार्श्वभूमीवर सांगलीची कामगिरी विक्रमी ठरली आहे. सुमारे तेरा कोटी रुपयांच्या शस्त्रक्रिया अगदी मोफत झाल्या. बालस्वास्थ्य कार्यक्रमात बालकांची आरोग्य तपासणी होते. त्यावेळी कर्णबधिर बालके शोधण्यात आली. मिशन ध्वनीअंतर्गत मुंबईत शस्त्रक्रिया झाल्या.

रोहित पाटलांच्या विनंतीनंतर वयोमर्यादेत वाढशस्त्रक्रियेसाठी दोन वर्षांपर्यंतची बालके पात्र आहेत. आर. आर. पाटील यांचे पुत्र पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यावर आठ वर्षांपर्यंत वयोमर्यादेला शासनाने परवानगी दिली. सध्या ती पुन्हा दोन वर्षे केली आहे.

स्पीच थेरेपीमध्ये सातत्यकर्णबधिरांना ऐकू येत नसल्याने शब्द समजत नाहीत, परिणामी ती मुकी होतात. शस्त्रक्रियेनंतर ऐकू येऊ लागले, तरी शब्द माहिती नसल्याने बोलणे खुंटते. त्यांच्यासाठी स्पीच थेरेपी राबवावी लागते. सांगली शासकीय रुग्णालयातील शीघ्र हस्तक्षेप केंद्रात (डीईआयसी) थेरेपीमध्ये सातत्य ठेवण्यात आले. त्याचा फायदा मुलांना झाला असून, ती बोलू लागली आहेत.

राज्यातील २४० शस्त्रक्रियांच्या तुलनेत सांगली १३० शस्त्रक्रियांसह आघाडीवर आहे. शासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्यातून कोट्यवधींच्या शस्त्रक्रिया फुकटात केल्या. सांगली डीईआयसीची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. - डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक.

टॅग्स :Sangliसांगली