शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याचा २२४ कोटींचा विकास आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:55 IST

जिल्हा नियोजन समितीने शासनास सादर केलेल्या २२४.१७ कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यंदाच्या आराखड्यात नावीन्यपूर्ण योजनेवर अधिक भर देण्यात येणार असून त्यासाठी आठ

ठळक मुद्देनावीन्यपूर्ण योजनेवर भर : अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक

सांगली : जिल्हा नियोजन समितीने शासनास सादर केलेल्या २२४.१७ कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यंदाच्या आराखड्यात नावीन्यपूर्ण योजनेवर अधिक भर देण्यात येणार असून त्यासाठी आठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली.

पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यासाठीच्या २२४.१७ कोटींच्या आराखड्यावर चर्चा होत सुधारणा सुचविण्यात आल्या होत्या. विकास कामांबरोबरच विविध योजनांची अंमलबजावणी व समाजातील प्रत्येक घटकाला निधीचा उपयोग व्हावा यादृष्टीने आराखडा तयार करण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नियोजन समिती सदस्यांच्या सहमतीनंतर हा आराखडा मंजुरीसाठी राज्य शासनास सादर करण्यात आला होता.

पुणे विभागीय कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे व जिल्हा नियोजन अधिकारी जे. डी. मेहेत्रे उपस्थित होते.

दरम्यान, जिल्ह्यासाठी २२४.१७ कोटींचा आराखडा असून त्यापैकी १२७.२५कोटी गाभा, तर ५३.२१ कोटी बिगर गाभा क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नावीन्यपूर्ण योजनेसाठी आठ कोटी आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी ३३.६३ कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.अतिरिक्त निधीची मागणीपुणे विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या पाचही जिल्ह्यातून ६४५.५७ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी यावेळी करण्यात आली. आहे. त्यात सांगली जिल्ह्यातून ६० कोटींच्या निधीची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी