शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

HSC Exam Result 2025: सांगली जिल्ह्याचा निकाल ९३.३९ टक्के; गतवर्षीपेक्षा झाली वाढ, कोणत्या शाखेची टक्केवारी सर्वाधिक.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:50 IST

सांगली : बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ९३.३९ टक्के लागला. ऑनलाइन निकालानुसार इस्लामपुरातील तीन विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले ...

सांगली : बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ९३.३९ टक्के लागला. ऑनलाइन निकालानुसार इस्लामपुरातील तीन विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. शिराळा तालुक्याने ९७.६७ टक्के गुणांसह सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यात आघाडी कायम राखली आहे. ६६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.७६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.०२ टक्के आहे. कोल्हापूर विभागात सांगली जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी दुपारी १ वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी मोबाइलमध्ये लक्ष केंद्रित केले होते. संकेतस्थळावर ताण असल्याने ते सुरू होत नसल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना आला. अनेक महाविद्यालयांतही विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला. उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात जल्लोष केला.एकूण ३२५ कनिष्ठ महाविद्यालयांतील १६ हजार १६८ विद्यार्थी आणि १५ हजार ३९ विद्यार्थिनी अशा एकूण ३१ हजार २०७ परीक्षार्थींनी ५१ केेंद्रांवर परीक्षा दिली. त्यापैकी १४ हजार ६२८ विद्यार्थी आणि १४ हजार ५१७ विद्यार्थिनी असे एकूण २९ हजार १४५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी ९०.४७ टक्के तर मुलींची टक्केवारी ९६.५२ टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.०२ टक्के लागला.१७ हजार ९१० परीक्षार्थींपैकी १७ हजार ५५७ उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल ८२.९६ टक्के लागला. ८ हजार १६२ परीक्षार्थींपैकी ६ हजार ७७२ उत्तीर्ण झाले. वाणिज्यचा निकाल ९४.२८ टक्के लागला. ४ हजार २०१ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ९६१ उत्तीर्ण झाले. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ९२ टक्के लागला. ९०० परीक्षार्थींपैकी८२८ उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ६१.६८ टक्के आहे. १ हजार २७१ पैकी ७८४ उत्तीर्ण झाले.तालुकानिहाय निकाल असा :शिराळा ९७.६७, कडेगाव९६.६३, पलूस ९६.२१, जत ९२०, मिरज ९५.४५, खानापूर ९४.४७, वाळवा ९६.८५, तासगाव ९३.२१, आटपाडी ९२.६८, कवठेमहांकाळ ९६.६७, महापालिका क्षेत्र ९०.२८ टक्के

०.७६ टक्के वाढगेल्या वर्षी बारावी निकालाची टक्केवारी ९२.६३ टक्के होती. यंदा यामध्ये ०.७६ टक्के वाढ झाली. कोल्हापूर विभागात सांगली जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. सातारा जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. गुणपडताळणीसाठी ६ ते २० मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीHSC Exam Resultबारावी निकाल