शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसानीचे मिळाले 'इतके' कोटी, सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा

By अशोक डोंबाळे | Updated: April 19, 2023 19:19 IST

४५ हजार ८६८ शेतकर्‍यांच्या २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

सांगली : जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे द्राक्ष, डाळींबांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ४५ हजार ८६८ शेतकर्‍यांचे २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांच्या पंचनाम्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला होता. जिल्ह्यातील ४१ हजार ८१५ शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ४६ कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे.जिल्ह्यातील ५१ शेतकर्‍यांच्या दुबार नुकसानीची नोंद असल्याने भरपाई राखून ठेवली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पिकांची नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. वादळी वार्‍यासह तुफान पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले होते, त्यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, भुईमूग, उडीद, मूग, सूर्यफूल, बाजरी, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा समावेश होता.प्रशासनाने दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी अतिवृष्टी, अतिपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचा अहवाल अंतिम केला होता. यामध्ये शिराळा तालुक्यातील एकाही शेतकर्‍याचे नुकसान झाले नव्हते. उर्वरित नऊ तालुक्यांतील ४५ हजार ८६८ शेतकर्‍यांच्या २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ४७ कोटी २५ लाख १५ हजार रुपये निधीची मागणी शासनाकडे केली होती.जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात जिल्हयात नुकसान झालेल्या ४१ हजार ८१५ शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईपोटी ४६ कोटी रुपयांची रक्कम बँक खात्यावर वर्ग केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी