शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगात सांगली जिल्हा देशात दुसरा, राज्यात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:38 IST

५३८ लाभार्थ्यांना साडेबारा कोटींचे अनुदान

सांगली : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये जिल्ह्यातील ५३८ लाभार्थ्यांच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली. ही योजना राबविण्यात सांगली जिल्हा देशात द्वितीय स्थानी व राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.२०२०-२१ ते २०२५-२६ या सहा वर्षांसाठी केंद्रीय उद्योग मंत्रालयाने ही योजना लागू केली आहे. सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांचा विस्तार वाढविणे, नवीन उद्योगांसाठी प्रोत्साहन देणे, असंघटित उद्योगांना संघटित स्वरूप देणे असा हेतू आहे. जिल्ह्यात २०२० पासून १ हजार २६७ प्रकल्प मंजूर झाले आहेत. लाभार्थ्यांना ३६ कोटी ३७ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.सन २०२४-२५ यावर्षी ५३८ लाभार्थ्यांच्या उद्योगांना मंजुरी मिळाली. त्यांना १२ कोटी ६७ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. बेदाणा प्रक्रिया, अन्नधान्य प्रक्रिया, मसाला उद्योग, बेकरी पदार्थ, पशुखाद्यनिर्मिती इत्यादी प्रकल्पांचा यात समावेश आहे. या योजनेद्वारे सुमारे ३ हजार ४६५ कामगारांना रोजगार निर्माण झाले.कुंभार म्हणाले, २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात ४७८ प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात ५३८ प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेत जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. १ हजार २७२ वैयक्तिक लाभार्थी, स्वयंसहायता गट लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

टॅग्स :Sangliसांगली