शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रधानमंत्री आवास घरकुलमध्ये सांगली जिल्हा राज्यात तिसरा, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाला गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 12:35 IST

सांगली : प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सांगली जिल्ह्याला ...

सांगली : प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सांगली जिल्ह्याला मिळाला आहे. याबद्दल जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुंबईत गुरुवारी गौरव करण्यात आला.‘सर्वांसाठी घरे- २०२४’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना योजनांची गतीने प्रभावी अंमलबजावणी करणे व कामात गुणवत्ता आणणे, हा या अभियानाचा हेतू होता. या अभियानात राज्यात प्रथम क्रमांक गोंदिया जिल्ह्याने तर द्वितीय क्रमांक नांदेड जिल्ह्याने पटकविला आहे.सांगली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडूनही उत्कृष्ट कामगिरी झाली आहे. अनेक घरकुलांची कामे पूर्ण करण्यासही त्यांनी प्राधान्य दिले होते. या कामगिरीमुळे जिल्हा राज्याला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, राहुल गावडे, डॉ. तानाजी लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत महाआवास अभियान २०२२-२३’ या अभियानाचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली