शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या डीजे, लेसरची सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

By संतोष भिसे | Updated: October 16, 2023 18:04 IST

सांगली : गणेशोत्सवात अवघ्या जिल्ह्याच्या छातीची धडधड वाढविणाऱ्या जीवघेण्या डीजे आणि लेसरच्या अतिरेकाची दखल जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ...

सांगली : गणेशोत्सवात अवघ्या जिल्ह्याच्या छातीची धडधड वाढविणाऱ्या जीवघेण्या डीजे आणि लेसरच्या अतिरेकाची दखल जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतली आहे. नवरात्रोत्सवात त्यावर प्रतिबंधासंदर्भात कायदेशीर तरतुदींनुसार भूमिका घेतली जाईल असे त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. गणेशोत्सवात यंदा ध्वनीमर्यादेवर निर्बंध नसल्याने डीजेचा अतिरेक झाला. घणाघाती आवाजाने काही तरुणांचे बळीही घेतली. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे शेकडो तरुणांच्या कानात बिघाड झाल्याच्या तक्रारी येत आहेत. मिरज व सांगलीत शासकीय रुग्णालयात कानाचा पडदा तपासण्यासाठी गेल्या महिन्याभरात अनेक तरुण आले. शिवाय मिरवणुकीदरम्यान, लेसरच्या वापरानेही अनेक तरुणांना दृष्टीदोषाचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या डोळ्यांतील बुब्बुळांमध्ये दोष निर्माण झाले आहेत.उत्सवात डीजे आणि लेसरच्या वापराविरोधात सार्वजिनक विरोध वाढत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी म्हणाले, डॉक्टरांच्या संघटना, तसेच काही सामाजिक संघटनांनी यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. उत्सवाची परंपरा, व्यावसायिक बाबी आणि लोकांचे आरोग्य या सर्वांचा एकत्रित विचार करुन निर्णय घेतला जाईल. नवरात्रोत्सवात डीजे व लेसरच्या वापराविषयी विचार केला जाईल.दरम्यान, या मानवी शररीराला घातक असलेल्या डीजे व लेसरविरोधात स्वत: डॉक्टरांनीच भूमिका घेतल्याने प्रशासनालाही त्याची गांभीर्याने दखल घेणे भाग पडले आहे. शासनाने डीजे, लेसरवर निर्बंध आणावेत, आवाजाची मर्यादा निश्चित करावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली