शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांच्या मद्य साठ्यावर सीसीटीव्हीचा वॉच, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

By अशोक डोंबाळे | Updated: March 19, 2024 18:56 IST

सहकारी बँका, साखर कारखान्यांनाही आचारसंहिता

सांगली : निवडणूक कालावधीमध्ये कोणताही गैरप्रकार आणि चुकीचा आर्थिक व्यवहार होऊ नये, यासाठी सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखान्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले पाहिजे. बँकांनी रोकड नेताना दक्ष राहावे, तसेच कारखान्यांनी मद्य साठ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कारखाना व्यवस्थापनाला दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सहकारी बँका, पतसंस्था व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सहकारी बँकांचे प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.

डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यातील बँकांनी व पतसंस्थांनी आचारसंहिता काळात बँकेची रोकड वाहतूक करताना काळजी घ्या. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. बँकांकडून रोकडची वाहतूक सुरू असते. मात्र, रोकड नेत असताना त्याबाबतचे लेखी पत्रही सोबत ठेवले पाहिजे. बँकांच्या गाड्यांचीही तपासणी केली जाऊ शकते. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत, याबाबतची दक्षता संबंधित बँकांनी घेण्याची गरज आहे.जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी आपल्या डिस्टिलरीच्या मद्य साठ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे आणि ते चोवीस तास चालू ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये दिरंगाई दिसून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नीता सावंत-शिंदे, जिल्हा अधीक्षक उत्पादन शुल्क प्रवीण पोटे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा परिषद मुख्य लेखा विठ्ठल चव्हाण आदी उपस्थित होते.

डिस्टिलरीवर असणार नजर : संदीप घुगेजिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, साखर कारखाने त्यांच्या डिस्टिलरी युनिटमधून तयार होणाऱ्या मद्यावर उत्पादन शुल्क व पोलिस विभागांनी एकत्रित लक्ष ठेवावे. आचारसंहितेला कुठेही गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केली. तर साखर कारखान्यांनी त्यांच्या मद्य साठ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत ठेवा, अशी सूचनाही त्यांनी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाला दिली.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा