शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत चुरसीच्या सामन्यात जयमातृभूमीची इस्लामपूरवर मात

By घनशाम नवाथे | Updated: February 6, 2024 17:47 IST

महिलात 'शिवाजी वाळवा' विजेते

सांगली : येथील कृष्णाकाठावर जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात डोळ्याचे पारणे फेडणारा थरार सांगलीच्या जयमातृभूमी आणि इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या लढतीत पहायला मिळाला. अवघ्या तीन गुणांनी जयमातृभूमीने विजय मिळवत चषकावर नाव कोरले. न्यू उत्कर्ष क्रीडा मंडळ व महापालिका कबड्डी खेळाडूंच्यावतीने आयोजित 71 वी जिल्हा कबड्डी स्पर्धा स्वामी समर्थ घाटावर झाली.स्पर्धेचा अंतिम सामना सांगलीचा जयमातृभूमी विरुध्द इस्लामपूर व्यायाम मंडळ यांच्यात झाला. दोन्ही तुल्यबळ संघामध्ये चढाई आणि पकडीची चुरस पहायला मिळाली. तसेच बोनससाठीही चढाओढ दिसून आली. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना 28-28 असा गुणफलक समान होता. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती. एकेक गुणासाठी खेळाडू कौशल्य पणाला लावत होते. जयमातृभूमीने अखेरच्या क्षणी पकडी करत 33-29 अशा चार गुणांनी विजय मिळवत शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.तत्पूर्वी सोमवारी महिलांचा अंतिम सामना शिवाजी वाळवा विरुद्ध प्रोग्रेस आरग यांच्यात झाला. या चुरसीच्या सामन्यात शिवाजी वाळवा संघाने 30-26 असा चार गुणांनी आरग संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीतजय मातृभूमी सांगलीने युवक मराठा सांगलीवाडीचा 26 गुणांनी पराभव केला. जयंत स्पोर्टस इस्लामपूरने स्वराज्य तासगावचा 14 गुणांनी पराभव केला. शिवाजी वाळवा संघाने महालक्ष्मी कुपवाडचा 5 गुणांनी पराभव केला. इस्लामपूर व्यायाम मंडळाने पटेल चौक मंडळाचा 33 गुणांनी पराभव केला.उपांत्य फेरीत इस्लामपूर व्यायाम मंडळाने शिवाजी वाळवा संघाचा 40-16 असा 24 गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यासाठी राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, जिल्हा बॅंक उपाध्यक्षा जयश्री पाटील, माजी नगरसेविका आशा पाटील, संयोजन समिती अध्यक्ष नितीन शिंदे, प्रशिक्षक पोपट पाटील, जयवंत पाटील, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.

चुरसीच्या सामन्यात वाददुसर्‍या उपांत्य सामन्यात जयंत स्पोर्टस विरुध्द जयमातृभूमी यांच्यातील चुरसीच्या सामन्यात पंचाचा निर्णय अमान्य करत जयंत स्पोर्टसने सामना सोडून दिला. 25-21 असा चार गुणांनी जयमातृभूमी संघ विजयी झाला.

टॅग्स :Sangliसांगली