शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

सांगली जिल्हा बँक चौकशीचे तळ्यात-मळ्यात सुरूच, अधिकारीही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 18:24 IST

चौकशी समितीला मुदतीत अहवाल सादर करण्याचे आदेश

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीला ‘ब्रेक’ लागला असतानाच मंगळवारी सहकार विभागाने आणखी एक पत्र पाठवून चौकशी समितीला मुदतीत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे चौकशीला स्थगिती मिळावी म्हणून राजकीय हालचालींना वेग आला आहे. कधी चौकशी सुरू होते, तर कधी थांबते, त्यामुळे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.विभागीय सहनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील पाचजणांच्या समितीने तक्रारीच्या अनुषंगाने बँकेतील अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची चौकशी अंतिम टप्प्यात आणली होती. २८ फेब्रुवारीला त्यांचा अहवाल सादर होणार होता; मात्र अंतिम टप्प्यात पथक बँकेत फिरकलेच नाही. त्यामुळे तक्रारदारांनी याबाबत विचारणा केली होती. चौकशी थांबल्याची तक्रार तक्रारदार सुनील फराटे यांनी सहकार विभागाकडे केल्याने सहकार विभागाने २८ फेब्रुवारीस पुन्हा आदेश काढून मुदतीत अहवाल सादर करण्याची सूचना दिली. त्याचवेळी चौकशीस स्थगिती मिळविण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.विभागीय सहनिबंधक डी.टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील पथकात विशेष लेखापरीक्षक शीतल चोथे, संजय पाटील, अनिल पैलवान, द्वितीय अपर लेखापरीक्षक रघुनाथ भोसले यांचा समावेश आहे. तक्रारीनुसार बँकेकडून माहिती घेऊन कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती.फराटे यांनीच जिल्हा बँकेतील कारभाराबाबत सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी चौकशीचे आदेश यापूर्वी दिले होते. परंतु चौकशीला २३ सप्टेंबर २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकारमंत्र्यांकडे बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.मार्चमुळे अडचणीचौकशी समितीला आवश्यक ती मदत करणाऱ्या जिल्हा बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आता मार्चच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहेत. संपूर्ण बँक वसुलीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे चौकशी पथकाला मदत करायची की बँकेचे उद्दिष्ट पूर्ण करायचे, असा प्रश्नही कर्मचाऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक