शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

सांगली जिल्हा बँकेची पीक कर्जाची थकबाकी २३७२ कोटींवर, आतापर्यंत किती झाली वसुली.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:57 IST

वसुलीसाठी विशेष मोहीम 

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेती कर्जाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. बँकेची शेतीकर्जाची जून २०२५ अखेरची वसूलपात्र रक्कम दोन हजार ३७२ कोटी ३२ लाख रुपये आहे. जूनपर्यंत ७५ टक्के वसुली झाली असून येत्या पंधरा दिवसांत १५ टक्के वसुली वाढवण्याचे जिल्हा बँक प्रशासनाचे प्रयत्न आहेत. जूनअखेरपर्यंत ९० टक्केंवर वसुलीचा आकडा नेण्यासाठी जिल्हा बँक प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेती कर्जाच्या वसुलीची मुदत जूनअखेर आहे. बँकेची शेतीकर्जाची जून २०२५ अखेरची वसूलपात्र रक्कम २ हजार ३७२ कोटी ३२ लाख रुपये आहे. यातील चालू वर्षी एक हजार ८८२ कोटी ७४ लाख व थकबाकी ४८९ कोटी ५७ लाख आहे. मे अखेर चालू व थकबाकी वसुलीची प्रक्रिया चालू आहे. एकूण वसूलपात्र रकमेच्या ६८ टक्के वसुली होती.पंधरवड्यामध्ये आणखी सात ते आठ टक्के वसुली झाली असून एकूण वसुली ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. शेती कर्जाच्या वसुलीसाठी जून अखेरची मुदत असून या मुदतीत ९० टक्के कर्ज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार वसुलीचे नियोजन केले आहे. प्रत्येक तालुक्यात बँकेचे प्रमुख अधिकारी जाऊन वसुलीचा आढावा घेत आहेत.

वसुलीसाठी विशेष पथकवसुलीसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून यामार्फत वसुलीला गती देण्यात आली आहे. थकबाकीदारांनी मुदतीत कर्ज भरून लाभ घ्यावा, अन्यथा जादा व्याजाचा भुर्दंड पडणार आहे. याशिवाय त्यांच्यावर नियम १०१ नुसार कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे. सध्या वसुलीला प्रतिसाद मिळत आहे. बँकेचे अधिकारी सुटीच्या दिवशीही वसुलीच्या कामात आहेत.

शेतकऱ्यांनी मुदतीत कर्ज भरावे : मानसिंगराव नाईकवसुलीसाठी जिल्हास्तरावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके तैनात केली आहेत. थकबाकी राहिल्यास काय फटका बसतो, याचीही माहिती ते शेतकऱ्यांना सांगत आहेत. शेतकऱ्यांनीही जादा व्याजाचा भुर्दंड बसू नये तसेच कायदेशीर कारवाईला समोरे जावे लागणार नाही यासाठी मुदतीत कर्ज भरून बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले आहे.

जिल्हा बँकेची आतापर्यंतची तालुकानिहाय वसुलीकडेगाव तालुका १४७ कोटी १७ लाख, वाळवा २२५ कोटी एक लाख, आटपाडी- १०८ कोटी ५६ लाख, खानापूर- ८४ कोटी ५७ लाख, शिराळा-७५ कोटी ८७ लाख, पलूस-१० कोटी ७१ लाख, मिरज-२०८ कोटी ५३ लाख, कवठेमहांकाळ-१३० कोटी ६० लाख, तासगाव-१८० कोटी ७२ लाख, आणि जत-२१५ कोटी ७० लाख.