शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

टॉप सहा थकबाकीदारांवर सांगली जिल्हा बँकेचा वॉच, या वर्षात बँकेला किती कोटींचा नफा..जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Updated: April 11, 2024 18:54 IST

नेट बँकिंग सुविधा देणार : मानसिंगराव नाईक

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस या वर्षात २०४ कोटींचा नफा झाला आहे. एनपीए पुढील वर्षी पाच टक्क्यांच्या आत आणणार आहे. त्यामुळे मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग सुविधा आणि शाखा विस्ताराला परवानगी मिळेल, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष व शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच टॉपच्या सहा थकबाकीदारांकडे बँकेचे लक्ष असून, १०० टक्के वसुली होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.मानसिंगराव नाईक म्हणाले, बड्या सहा कर्जदारांकडे जवळपास ४०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांकडून वसुलीची प्रक्रिया चालू आहे. या थकबाकीदारांविरोधात सहकार न्यायालयात दावा सुरु असून, निश्चित येत्या काही दिवसात १०० टक्के वसुली होणार आहे. कर्जाची खाती एनपीएमध्ये गेलेल्यांकडून १०१ कोटी ६६ लाख रुपयांची वसुली करण्यात बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यश आले आहे. खानापूर, जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मोठी थकबाकी कमी करण्यात यश आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९३५ कोटींनी ठेवी वाढून सात हजार ९०५ कोटी ठेवी झाल्या आहेत. एक हजार १६६ कोटींनी कर्जात वाढ होऊन सध्या सहा हजार ६९६ कोटींचे कर्जवाटप आहे. मागील वर्षी १३४ कोटी नफा झाला होता.यामध्ये ७४ कोटींची वाढ होऊन यंदा २०४ कोटींचा नफा झाला आहे. बँकेने शेतकऱ्यांना ओटीएस योजनेसाठी नफ्यातून १५ कोटी प्रोत्साहन रकमेची तरतूद केली आहे. शेती कर्ज वाटपात बँकेचा जिल्ह्यातील हिस्सा ७२ टक्के आहे. आता बँक लाभांश वाटपास पात्र ठरली आहे.जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, संचालक अजितराव घोरपडे, मोहनराव कदम, महेंद्र लाड, संग्रामसिंह देशमुख, राहुल महाडिक, सरदार पाटील, तानाजी पाटील, पृथ्वीराज पाटील, वैभव शिंदे, सुरेश पाटील, प्रकाश जमदाडे, सत्यजित देशमुख, मन्सूर खतीब, बी.एस. पाटील, अनिता सगरे आदी उपस्थित होते.

जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती

  • जिल्हा बँकेचा १४५०० कोटींचा व्यवसाय
  • जिल्ह्यातील १० पैकी पाच तालुक्यांचे ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण
  • बँकेच्या २१८ पैकी ११३ शाखांकडून ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण
  • कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात पीक कर्जाची वसुली पूर्ण
  • एनपीए वसुलीत पलूस सर्वात मागे
  • बिगरशेती कर्जाची १०४२२ कोटींची वसुली
  • प्रत्येक तालुक्यात एकनुसार १० शाखांना मागितली परवानगी
टॅग्स :Sangliसांगलीbankबँक