शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेने आटपाडीतील ४० कोटींची सूतगिरणी विकली १४ कोटींत, शासनाकडून सीईओंची खरडपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 17:44 IST

शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या आजी-माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून त्यांची कानउघाडणी केली.

सांगली : थकीत कर्जवसुलीसाठी जिल्हा बँकेने ४० कोटी वाजवी किंमत (अपसेट प्राइस) असलेली आटपाडीतील बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी केवळ १४ कोटी रुपयांमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याबाबत शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या आजी-माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून त्यांची कानउघाडणी केली.या सूतगिरणीला जिल्हा बँकेने आधी मध्यम मुदत कर्ज दिले. या कर्जापोटी सूतगिरणीची जमीन व अन्य स्थावर, जंगम मालमत्ता तारण घेतली. या सूतगिरणीच्या आवारात विजयालक्ष्मी कॉटन मिल आहे. या मिलची मालमत्ताही बँकेच्या थकीत कर्जासाठी ताब्यात घेतली आहे. मध्यम मुदत कर्ज फिटल्यानंतर सूतगिरणीला पुन्हा १० कोटी रुपये मालतारण कर्ज दिले. यासाठी पूर्वी बँकेकडे तारण असलेलीच स्थावर व जंगम मालमत्ता पुन्हा तारण ठेवण्याचे पत्र सूतगिरणीने दिले. त्यानंतर दहा कोटींचे कर्ज थकीत राहिले. व्याजासह ही रक्कम १४ कोटींच्या घरात गेली.थकबाकी वसुलीसाठी बँकेने संस्थेचा लिलाव काढला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांनी अन्य संस्थांप्रमाणे ही संस्थाही बँकेच्या नावे खरेदी केली. दरम्यान, संस्थेची पुन्हा एकदा निविदा काढली. या निविदेत बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणीच्या स्थावर, जंगम मालमत्तेचे मूल्यांकन करून सुमारे ४० कोटी रुपये वाजवी किंमत ठेवली. नियमानुसार ४० कोटींपेक्षा जास्त सर्वाधिक बोली असणाऱ्या निविदाधारकाला ही सूतगिरणी देणे आवश्यक होते; पण अवघ्या १४ कोटी रुपयांना तिची विक्री केली.बँकेची येणे बाकी वसूल केली; पण या सूतगिरणीवर शासनाचे २५ कोटींचे कर्ज आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांची देणी, शासकीय कर अशी कोट्यवधी रुपयांची देणी आहेत. जिल्हा बँकेने ही देणीही लिलाव करताना वसूल करणे आवश्यक होते. बँक सोडून अन्य देणी खरेदीदार कंपनीने द्यायची आहेत, अशी अट घालून बँकेने सूतगिरणी विकली; पण खरेदीदार कंपनीने ही देणी दिलेली नाहीत.वस्त्रोद्योग मंडळाने नागपुरात झालेल्या सुनावणीवेळी बँकेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांची कानउघाडणी करत हा व्यवहार नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक