शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँक निवडणूक : मतदारांनो बिनधास्त करा मतदान, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 15:25 IST

जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. विकास सोसायटी गट सोडून अन्य गटातील उमेदवारांना जिल्ह्यातून मतदान होणार आहे.

सांगली : जिल्हा बँक निवडणुकीत मतदारानी कोणत्याही अमिषाला दबावाला बळी न पडता निर्भय पणे मतदान करावे. कोणी कोणाला मतदान केले, प्रत्येक तालुक्यात कोणत्या उमेदवाराला किती मते पडली याची माहिती समजणार नाही. मतदारांची गोपनियता पाळली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी सांगितले.जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. विकास सोसायटी गट सोडून अन्य गटातील उमेदवारांना जिल्ह्यातून मतदान होणार आहे. या गटातील उमेदवारांने प्रत्येक तालुक्यात किती मतदान झाले याची माहिती मजमोजणीत समजणार असल्याचे सांगत काही उमेदवारांकडून मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे.  पतसंस्था, प्रक्रिया, औद्यागिक, गृहनिर्माण, मजुर, बॅँका आदी. सहकारी संस्थातील मतदारांची प्रत्येक तालुक्यात मर्यादीत संख्या आहे. यामुळे संस्थातील मतदारांवर दबाव टाकला जात आहे.

याबाबत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी निळंकठ करे म्हणाले, गट अ मध्ये त्या त्या तालुक्यातील संस्था मतदार मतदान करणार आहे. मात्र महीला राखीव, अनुसुचित जाती जमाती, ओबीसी व भटक्यात जाती जमाती या मतदार संघासह गट क १ ते ४ मधील उमेदवारांना संपूर्ण जिल्ह्यातील संस्था मतदार मतदान करणार आहेत. मतमोजणी वेळी या गटातील सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे बांधले जाणार असून नंतर ते टेबल निहाय मोजले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच मतपत्रीका एकत्र होणार असल्याचे विकास सोसायटी सोडून अन्य गटातील कोणत्याही उमेदवारास कोणत्या तालुक्यातून, कोणत्या संस्था गटातून किती मतदान झाले हे कळणार नाही. जिल्ह्यातीत एकूण मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भय वातावरणात मतदान करावे. मतदरांची गोपनीयता शंभर टक्के पाळली जाणार आहे.मतदान केंद्रात व्हिडीओ कॅमेरेमतदान केंद्रात मतदारांची मतदान करताना पुर्ण पणे गोपनियता बाळगली पाहिजे. मतदाराकडून गोपनियतेचा भंग करत मतपत्रीका केंद्रातील अन्य कोणाला दाखवण्याचा प्रकार झाल्यास ती मतपत्रीका केंद्राध्यक्षांकडे जमा करण्यात येणार आहे. अशी मतपत्रीका मतदान पेटीत टाकली जाणार नाही. हे मत बाद करण्यात येणार आहे. गोपनियमात भंग होवू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात व्हिडीओ कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक