शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Sangli: बसस्थानकांवरील व्यावसायिकांना लॉकडाऊन, संपकाळासाठी परवाना शुल्कात सवलत

By संतोष भिसे | Updated: November 27, 2022 15:16 IST

Sangli: लॉकडाऊन आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात बसस्थानकांवरील परवानाधारक वाणिज्य आस्थापनांना परवाना शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- संतोष भिसे  सांगली - लॉकडाऊन आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात बसस्थानकांवरील परवानाधारक वाणिज्य आस्थापनांना परवाना शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ मुंबई, पुण्यासह राज्यभरातील हजारो व्यावसायिकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.

लॉकडाऊनमध्ये सुमारे दोन वर्षे एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरु नव्हती. यापैकी वर्षभर तर पूर्णत: बंद होती. या काळात प्रवासीच नसल्याने स्थानकांतील व्यावसायिकांचा व्यवसाय बंद राहिले होते. उपहारगृहे, बेकरी, रसगृहे, लॉटरी सेंटर्स, फोन बुथ आदी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या स्थितीत एसटीचे परवाना शुल्क मात्र कायम होते. ते रद्द करण्याची मागणी राज्यभरातून होत होती.  तोट्यात असलेल्या महामंडळाने  त्याला मान्यता  दिली  नाही. हा विषय बैठकीत चर्चेला आला असता सकारात्मक निर्णय झाला. त्यामुळे गाळेधारकांना दिलासा मिळाला आहे.

सांगली विभागातील अनेक गाड्या दोन वर्षे जागेवरच थांबून राहिल्याने नादुरुस्त झाल्या आहेत. काही गाड्या नुकत्याच भंगारात काढण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर पुणे व सांगली विभागांसाठी मिळून १८० नव्या गाड्या उपलब्ध होणार आहेत. सीएनजी गाड्यांसाठी पुरेशा संख्येने चेसिस उपलब्ध होत नाहीत, शिवाय सीएनजी पंपांची संख्याही कमी आहे, त्यामुळे डिझेल गाड्या घेतल्या जाणार आहेत. बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :Sangliसांगली