शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील मधुमेहमुक्ती संशोधनास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता, ५० लोकांवरील प्रयोग यशस्वी 

By अविनाश कोळी | Updated: March 28, 2023 14:55 IST

गेल्या दोन वर्षांपासून मधुमेही रुग्णांवर मोफत उपचार

सांगली : गेल्या दोन वर्षांपासून मधुमेही रुग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या सांगलीतील केंद्रात ५० रुग्णांवर केलेल्या मधुमेहमुक्ती प्रयोगाला व संशोधनाला इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड करंट रिसर्च या संस्थेने मान्यता दिली आहे. नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या जर्नलमध्ये या संशोधनाला स्थान देण्यात आले आहे.सांगलीतील मधुमेहमुक्ती केंद्र हे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली गेली दोन वर्षे सुरू आहे. सांगलीच्या केंद्रामधून मागील वर्षी एक संशोधन करण्यात आले. ५० लोकांच्या मधुमेहमुक्तीची वाटचाल करताना त्यांचे प्रत्येक महिन्याचे वैद्यकीय अहवाल नोंदविले गेले. त्यावर संशोधन अहवाल तयार करण्यात आला. इंटरनॅशनल जर्नलकडे तो पाठविण्यात आला. त्याची तपासणी करण्यासाठी एक पथक पाठविण्यात आले. त्यांनी रुग्णांचा इतिहास व वैद्यकीय अहवालांची पाहणी केली. तपासणीचा अहवाल त्यांनी संबंधित संस्थेला पाठविल्यानंतर तो स्वीकारण्यात आला. त्याची मार्च-एप्रिलच्या संशोधन लेखात प्रसिद्धी करण्यात आली.सांगलीचे डॉ. सतीश परांजपे, मेघना भिडे, चिंतामणी बोडस, भावना शहा, श्रीरंग केळकर आणि केंद्रास जागा देणाऱ्या डॉ. शार्दुली तेरवाडकर यांच्यामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले. भारती विद्यापीठातर्फे डॉ. राजेंद्र भागवत यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने संशोधन पाहणी केली.

पॅटर्न काय आहे?नित्य ठरावीक प्रकारचा आहार, हलके व्यायाम आणि जीवनशैलीत काही बदल करून मधुमेहमुक्तीचा प्रयोग करण्यात आला. हा पॅटर्न यशस्वी ठरला आहे.

टाईप टू मधुमेहींवर प्रयोगसंशोधन केलेले सर्व रुग्ण टाईप टू मधुमेह असलेले आहेत. प्रत्येक महिन्याला त्यांची रक्त चाचणी केली. त्याचा आलेख खाली जात हे रुग्ण मधुमेहमुक्त झाले.

टाईप टू मधुमेह काय आहे?मधुमेहाचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात (टाइप-१) शरीरात इन्सुलिन नाममात्र तयार होते किंवा पूर्णपणे नष्ट झालेले असते. दुसऱ्या प्रकारात (टाइप-२) स्थूलतेमुळे शरीरातील इन्सुलिनच्या क्षमतेला अवरोध निर्माण होतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढत राहते. भारतात मधुमेहाचे रुग्ण बहुतांशी या दुसऱ्या प्रकारचे आहेत.

या डॉक्टरांचा संशोधन लेखात उल्लेखसंशोधन लेखात सांगलीतील डॉ. सतीश परांजपे, डॉ. रत्ना आष्टेकर, डॉ. गिरीश धुमाळे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. श्रद्धा बडगुजर यांचा उल्लेख केला आहे.

टॅग्स :Sangliसांगली