शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : वीजेच्या तारेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 14:00 IST

कावजी खोतवाडी (ता. मिरज) येथे शेतात औषध फवारणी करीत असताना तुटलेल्या वीजेच्या तारेचा धक्का बसून तरूणाचा मृत्यू झाला. अभिजित रामचंद्र पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचे आई-वडील दोघेही गंभीर जखमी झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.

ठळक मुद्दे वीजेच्या तारेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यूखोतवाडीतील घटना : आईवडील गंभीर जखमी

सांगली : कावजी खोतवाडी (ता. मिरज) येथे शेतात औषध फवारणी करीत असताना तुटलेल्या वीजेच्या तारेचा धक्का बसून तरूणाचा मृत्यू झाला.

अभिजित रामचंद्र पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचे आई-वडील दोघेही गंभीर जखमी झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.जखमींमध्ये रामचंद्र विष्णू पाटील (वय ५२) व राजश्री पाटील (४५) यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामचंद्र पाटील हे आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह खोतवाडीत रहातात. घराशेजारीच त्यांची शेती आहे. तर एक मुलगा पुण्यात नोकरी करतो. मंगळवारी रात्री खोतवाडी परिसरात सुसाट वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. त्यांच्या शेतातून विद्युत वाहिनी गेली आहे. पाऊस व वाऱ्यामुळे वीजेची तार तुटली होती.

सकाळी सात वाजता अभिजित हा ऊसावर औषध फवारणीसाठी शेतात गेला होता. औषध फवारणी करीत असताना त्यांचा पाय वीजेच्या तारेवर पडला.

वीजेच्या जोरदार धक्क्याने तो खाली कोसळला. ते पाहून त्याची आई राजश्री या धावल्या. त्यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही वीजेचा धक्का बसून त्या बाजूला फेकल्या गेल्या. दोघेजण शेतात पडल्याचे पाहून वडील रामचंद्र हेही त्यांना वाचविण्यासाठी धावले. त्यांनाही धक्का बसला.पाटील कुटूंबियाचा आरडाओरडा पाहून आजूबाजूचे लोकांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. विद्युत प्रवाह खंडीत करून तिघांनाही तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अभिजितचा मृत्यू झाला होता. तर आई-वडील दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात