शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कॉंग्रेसतर्फे उपोषण, भाजपने गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत  :विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 18:51 IST

Vishwajeet Kadam Congress Sangli -केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोधासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवन समोर शुक्रवारी उपोषण आंदोलन झाले. त्यामध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, पृथ्वीराज पाटील, मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील आदी सहभागी झाले.

ठळक मुद्देसांगलीत कॉंग्रेसतर्फे उपोषण, भाजपने गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत  :विश्वजीत कदम शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव

सांगली : केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे असल्यामुळे त्वरीत रद्द करावेत अशी मागणी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केली. कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पक्षाने उपोषणाच्या माध्यमातून पाठिंबा दिला.केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोधासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवन समोर शुक्रवारी उपोषण आंदोलन झाले. त्यामध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, पृथ्वीराज पाटील, मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील आदी सहभागी झाले.कॉंग्रेस भवनसमोर आंदोलनाचे नेतृत्व डॉ. कदम यांच्यासह आमदार मोहनराव कदम, काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, शैलजा पाटील, विशाल पाटील, पक्षाचे निरीक्षक सचिन नाईक, जितेश कदम आदींनी केले.डॉ. कदम म्हणाले, कृषी कायद्यांवर कोणतीही चर्चा न करता भाजप सरकारने जबरदस्तीने मंजूर केले. कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर लाखो शेतकरी चार महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. सरकारने त्यांच्याशी चर्चेचे नाटक केले, पण कायदे मागे घेतले नाहीत. तीनशेहून अधिक शेतकरी शहीद झाले, त्याचीही दखल घेतली नाही. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे.आंदोलनात पै. नामदेवराव मोहिते, उपमहापौर उमेश पाटील, मंगेश चव्हाण, बाळासाहेब गुरव, आप्पासाहेब पाटील, आशा पाटील, वहिदा नाईकवडी, दिलीप पाटील, अजित भोसले, अजित ढोले, अजित शिरगावकर, सुभाष खोत, सदानंद जवळगे, सुवर्णा पाटील, मालन मोहिते, वैशाली वाघचौरे, बिपीन कदम, अण्णासाहेब कोरे, संजय मेंढे, वसीम रोहिले, प्रताप चव्हाण, शुभांगी साळुंखे, फिरोज पठाण, आरती वळवडे, मनोज सरगर, अमर निंबाळकर, संतोष पाटील, प्रशांत पाटील, ताजुद्दीन तांबोळी, सनी धोत्रे, अयुब निशाणदार आदी सहभागी झाले.भाजप नेत्यांची कटकारस्थानेमहाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपचे नेते कटकारस्थान करत आहेत. फोन टॅपिंगचे प्रकरण त्याचाच एक भाग आहे. महागाई, गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्याऐवजी नसते उद्योग चालवले आहेत. काहीही करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी खटाटोप सुरू आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमSangliसांगली