शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Sangli: पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजीचे ढग गडद, जिल्ह्यात ४०.१९ टक्के पेरण्या

By अशोक डोंबाळे | Updated: June 29, 2024 19:12 IST

Sangli News: शेतशिवार पेरणीकरिता सज्ज असूनही मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे पेरणीला काहीसा ब्रेक लागला आहे. मृग नक्षत्रात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात झाली असून बघता-बघता जिल्ह्यात ४०.१९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.

- अशोक डोंबाळे सांगली - शेतशिवार पेरणीकरिता सज्ज असूनही मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे पेरणीला काहीसा ब्रेक लागला आहे. मृग नक्षत्रात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात झाली असून बघता-बघता जिल्ह्यात ४०.१९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. सद्या पाऊस रुसलेलाच असल्याने शेतकऱ्यांमध्ये आता काळजीचे ढग आणखीच गडद व्हायला लागले आहेत.

दरवेळी शेतकरी मृग नक्षत्राला सुरुवात झाली की, शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागतो. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून हे नक्षत्र संपले. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस, कडेगाव, तासगाव, मिरज, वाळवा, शिराळा तालुक्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. परंतु, काही ठिकाणी आजही पेरणीयोग्य पाऊस कोसळला नाही. आताही आकाशात ढगांची गर्दी होते. मात्र पावसाचा जोर नसल्याने दिवसागणिक शेतकऱ्यांची काळजी वाढत आहे. आता आर्द्रा नक्षत्र लागले असून यातील मोरही थुई थुईच नाचत आहेत, त्यालाही फारसा जोर नसतानाही शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर ४०.१९ टक्के पेरण्या उरकल्या आहेत. जिल्ह्यात खरीप पेरणीचे सरासरी दोन लाख ५५ हजार ९८४.७४ हेक्टर क्षेत्र असून एक लाख दोन हजार ८७३.३० हेक्टरपर्यंत पेरण्या आटोपल्या असून यात भात, सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली आहे. आता त्या पाठोपाठ कडधान्याच्या पेरणीलाही सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास दुबार पेरणीचे संकट अटळ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेली पेरणीतालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारीमिरज २४६७१.०५ १५४५.२० ७.५०जत ७५२२० ५३२३५.४५ ६७.०७खानापूर १६१०० २९११ १८वाळवा २३१२२ १३६७६ ५९.७६तासगाव ३३१२८ ६९६.७० २.१०शिराळा २२६०५ १४६१८ ६४.१७आटपाडी १०७५० ४२२६ ३९.३१क.महांकाळ २१३७३ ५०८५ २३.७५पलूस ६१०८.४ ७५० १२.२८कडेगाव १९९१६ ५७२९ २८.७७

 १ जूनपासून आतापर्यंतचा पाऊसतालुका पाऊस (मिलीमीटर)मिरज २१२.८जत २१६खानापूर २००.७वाळवा २४१.४तासगाव २४२.४शिराळा २२५.३आटपाडी १९७.७कवठेमहांकाळ २५६.९पलूस १९१.७कडेगाव २१४एकूण २२२.७

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रSangliसांगली