शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत स्वच्छता अ‍ॅपमध्ये सांगली राज्यात प्रथम, देशात १५ व्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 13:00 IST

शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत स्वच्छता अ‍ॅपमध्ये सांगली महापालिका महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर, तर देशात १५ व्या क्रमांकावर आहे. स्वच्छताअ‍ॅप स्पर्धेत महापालिकेने सातत्य राखल्यास किमान २० कोटींचे अनुदान मिळणार आहे. स्वच्छतेत लोकसहभाग वाढविण्यासाठी आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार हे प्रयत्नशील आहेत.

ठळक मुद्देस्वच्छता अ‍ॅपमध्ये सांगली महापालिका महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावरसातत्य राखल्यास किमान २० कोटींचे अनुदान मिळणार केंद्रीय पथक २२ रोजी सांगलीत येणार 

सांगली : शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत स्वच्छता अ‍ॅपमध्ये सांगली महापालिका महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर, तर देशात १५ व्या क्रमांकावर आहे. स्वच्छताअ‍ॅप स्पर्धेत महापालिकेने सातत्य राखल्यास किमान २० कोटींचे अनुदान मिळणार आहे. स्वच्छतेत लोकसहभाग वाढविण्यासाठी आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार हे प्रयत्नशील आहेत.सात दिवसांपूर्वी स्वच्छ अ‍ॅपमध्ये सांगली महापालिका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होती, तर देशात १७ व्या क्रमाकांवर होती. आता सांगली महापालिका राज्यात पहिल्या स्थानावर आली आहे. प्रशासनाने स्वच्छता, कचरा उठाव याबरोबर नागरिकांसाठी स्वच्छ अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जानेवारीपासून अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. एक ते दहा लाखापर्यंत लोकसंख्या असणाऱ्या शहरांसाठी ही स्पर्धा आहे. आतापर्यंत १९ हजार १२० अ‍ॅप डाऊनलोड केले आहेत. चार हजारहून अधिक नागरिक भागातील तक्रारी अ‍ॅपवर डाऊनलोड करीत आहेत. या तक्रारींचे २४ तासात निराकरण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. गेल्या आठवडाभरात शहराचे गुणांकन वाढले आहे.घराघरातील कचरा नियमित उचलला जावा, यासाठी ई-रिक्षा घंटागाडीची खरेदी करण्यात येणार आहे. नुकतेच नवीन नऊ रिक्षाघंटागाड्या घेतल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. यापासून तयार झालेले खत विकण्यासाठी बचतगटांना काम देण्याचे नियोजन आहे. प्लास्टिकमुक्तीसाठी बचत गटाच्या महिलांना कापडी पिशव्या तयार करण्याचे काम दिले आहे. प्रशासनाने महापालिकेला स्वच्छता अभियनात देशात नावलौकिक प्राप्त करून देण्याचा निर्धार केला आहे.केंद्रीय पथक २२ रोजी सांगलीत येणार शहराचे स्वच्छ सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय पथक २२ रोजी सांगलीत येणार आहे. या पथकाकडून स्वच्छतेबाबत महापालिका राबवत असलेल्या उपाययोजनांची तपासणी केली जाणार आहे. काही भागाला भेटी देणार आहेत. नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांच्याशीही चर्चा करणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली