शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली सिव्हीलमध्ये अग्नीरोधी उपायांसाठी पावणेदोन कोटींची फाईल दोन वर्षे धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 18:33 IST

Fire Hospital Sangli- पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट दोन वर्षांपूर्वी झाले, पण त्यातील शिफारशींची अंमलबजावणीच झाली नसल्याचे पुढे आले. अग्नीरोधी तरतुदी पूर्ण करण्यासाठी पावणेदोन कोटींचा निधी अपेक्षित असून त्याची फाईल शासन दरबारी निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे.

ठळक मुद्देअग्नीरोधी उपायांसाठी पावणेदोन कोटींची फाईल दोन वर्षे धूळ खातसांगली सिव्हीलमध्ये आगीच्या दुर्घटनांबाबत शासनच बेफिकीर

सांगली : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट दोन वर्षांपूर्वी झाले, पण त्यातील शिफारशींची अंमलबजावणीच झाली नसल्याचे पुढे आले. अग्नीरोधी तरतुदी पूर्ण करण्यासाठी पावणेदोन कोटींचा निधी अपेक्षित असून त्याची फाईल शासन दरबारी निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे.२०१८ मध्ये शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले. त्यासाठी सिव्हिल प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला. रुग्णालय इमारतीच्या भल्यामोठ्या पसार्यात पुरेशी अग्नीरोधी यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाले. काही सिलींडर ठिकठिकाणी नाममात्र अडकवून वेळ मारुन न्यावी लागत आहे. गेल्या काही वर्षांत सिव्हीलमध्ये आगीची विशेष दुर्घटना घडली नसल्यानेही त्याविषयी कोणी गंभीर नसल्याचेही दिसते.दोन वर्षांपूर्वी फायर ऑडिटनंतर त्रुटी पूर्ण करण्याचे ठरले. ऑडिटमधील शिफारशींनुसार पुर्ततेसाठी अंदाजपत्रक तयार केले. विविध उपकरणे बसविण्यासाठी १ कोटी ७० लाखांचा खर्च होईल असे स्पष्ट झाले. यामध्ये ठिकठिकाणी स्प्रिंकलर्स, स्मोक डिटेक्टर्स, आवश्यक तेथे नव्या वीजवाहिन्या व अंतर्गत फिटींग, आग विझविण्यासाठी पाणीपुरवठा, नवे फायर एक्स्टीनगिशर्स इत्यादीचा समावेश होता.या खर्चाची फाईल शासनाकडे सादर झाली, पण दोन वर्षे झाली तरी निर्णय झालेला नाही. मंत्रालयात प्रस्ताव धऊल खता पडला आहे. आरोग्य संचालनालय, अर्थ विभाग, सार्वजनिक बांधकाम या सर्वांकडे फाईल फिरुन आली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांतील आगीच्या दुर्घटना व फायर ऑडिटविषयी शासनच बेफिकर असल्याचे स्पष्ट झाले आहे.पुन्हा ऑडिटची गरज काय ?भंडारा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत, पण सांगलीतील दोन वर्षांपुर्वीच्या ऑडिटचा प्रस्तावच अद्याप धूळ खात पडला असताना नव्याने पुन्हा ऑडिटची गरजच काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगली-मिरजेत रुग्णालयांच्या नव्या इमारतींसाठी कोट्यवधींचा खर्च होत असताना अग्नीरोधी उपायांसाठी मात्र एक-दोन कोटींचा खर्च केला जात नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. 

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटलSangliसांगली