शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :  आश्वासनांचे गाजर...हवेत बुडबुडे.. अन् शंभर कोटीचा लाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 18:00 IST

आश्वासनांची गाजरे...पाण्याचे बुडबुडे... शंभर कोटीचा लाडू आणि हवेत फुगे सोडत सोमवारी सांगली महापालिकेसमोर विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप सत्तेच्या शंभर दिवसातील कारभाराचा पंचनामा केला.

ठळक मुद्देभाजप सत्तेची शंभरी : काँग्रेस-राष्ट्रवादीचे सांगली महापालिकेसमोर अभिनव आंदोलनशंभर दिवस पुर्ण झाले. या कालावधीत एकही काम मार्गी लागले नाही. विकासात्मक एकही निर्णय झालेला नाही

सांगली : आश्वासनांची गाजरे...पाण्याचे बुडबुडे... शंभर कोटीचा लाडू आणि हवेत फुगे सोडत सोमवारी सांगली महापालिकेसमोर विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप सत्तेच्या शंभर दिवसातील कारभाराचा पंचनामा केला. महापालिकेतील भाजप सत्ताधाºयामुळे नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. साथीच्या आजाराने नागरिकांचे बळी जात आहे. तरीही पारदर्शी कामाचा ढोंगीपणा सुरू असल्याचा आरोप  करून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. 

या आंदोलनात विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संतोष पाटील,मंगेश चव्हाण, वहिदा नायकवडी, रोहिणी पाटील, वर्षा निंबाळकर, आरती वळवडे, मदिना बारुदवाले, फिरोज पठाण, मनोज सरगर, शुभांगी सांळुखे, करण जामदार, उमेश पाटील, राष्ट्रवादीचे शेठजी मोहिते, योगेंद्र थोरात, संगीता हारगे आदी सहभागी झाले होते. भाजप सत्ताधाºयांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत हातात आश्वासनांचे गाजर दाखवत ,पाण्याचे बुडबुडे व हवेत फुगे सोडत आंदोलक सहभागी झाले होते. महापालिका सत्तेत येऊन शंभर दिवस पुर्ण झाल्यानंतर ही नागरी सुविधांबाबत काहीही केले नाही. कचरा उठाव नाही, औषध फवारणी नाही, विकास कामाचे तसेच पारदर्शी कामाचे गाजर दाखवत भाजप सत्ताधाºयांनी सत्ता मिळवली. मात्र आश्वासनांचा लाडू आरशातच दिसल्याचा आरोपही करण्यात आला. 

यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले,भाजपाची महापालिकेत सत्ता येवून शंभर दिवस पुर्ण झाले. या कालावधीत एकही काम मार्गी लागले नाही. विकासात्मक एकही निर्णय झालेला नाही. उलट प्रशासन सत्ताधाºयांचे ऐकेना अशी स्थिती निर्माण झाल्याने शहरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासन आणि सत्ताधारी वादात उद्याने भकास झाली आहेत. कचरा उठाव ठप्प झाला आहे. साथीचे आजार पसरले आहेत. घरटी एक व्यक्ती आजारी आहे. शहर सुधारण्याचा विडा उचलणाºया भाजपला पहिल्या शंभर दिवसात नागरी प्रश्नही सोडवता आले नाही. प्रशासनावर वचक राहिला नाही. भाजपचे नेते अपयशी ठरले आहेत. नागरीकांना शंभर कोटीचा आणखी एक लाडू दाखवत आहे. जनतेसमोर हे मांडण्यासाठीच आम्ही आंदोलन केल्याचे सांगितले. नगरसेवकांची घोषणाबाजीशंभर दिवस पूर्ण झाले, सत्ताधाºयांना साधी ट्युब बसविली नाही, डेंग्यु आणि स्वाईल फ्ल्यूनी जीव नको केला, पण यांचे सोयरेसुतक नाही या भाजपवाल्यांना, रस्ते, गटारी, नाला, मंडई, कामे थांबलेली, उद्यानामधील झाडे ही वाळलेली, शंभर दिवस पुर्ण झाले सत्ताधाºयांना,अशा घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिल्या.

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगली