शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या सुपुत्राने जिंकली अमेरीकेच्या ॲटलांटामधील क्रिकेट लिग, देशभरात प्रसिद्ध आहे लीग

By संतोष भिसे | Updated: October 3, 2022 17:00 IST

लीगमध्ये जगभरातील दहाहून अधिक देशांमधील १०० संघांनी सहभाग घेतला होता,

सांगली : अमेरिकेतील ॲटलांटा येथील प्रतिष्ठेची क्रिकेट लीग स्पर्धा कळंबी (ता. मिरज) येथील अंकुर माळी याच्या संघाने जिंकली. अंकुरने आपल्या कुशल कर्णधारपदाने शार्कस संघाला यशोशिखरापर्यंत पोहोचविले.लीगमध्ये जगभरातील दहाहून अधिक देशांमधील १०० संघांनी सहभाग घेतला होता, त्यामुळे सामने अत्यंत चुरशीने झाले. दरवर्षी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बाजी मारण्यासाठी अनेक नाणावलेल्या संघांमध्ये संघर्ष रंगतो. अटलांटा क्रिकेट लीग अमेरिकेतील जिंकण्यासाठीची सर्वात कठीण क्रिकेट स्पर्धा मानली जाते. तेथे क्रिकेटचा खेळ फारसा लोकप्रिय नसला, तरी ही लीग स्पर्धा देशभरात प्रसिद्ध आहे. ती पाहण्यासाठी व क्रिकेटचा आनंद संपूर्ण अमेरीका खंडातील क्रिकेट रसिक गर्दी करतात. अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविण्याचा मान सांगलीच्या सुपुत्राला मिळाला.त्याची शार्कस टीम गेली चार वर्षे उपांत्य फेरीपर्यंत पोहोचत होती, पण प्रत्येकवेळी विजयश्री हुलकावणी देत होती. यावर्षी मात्र संघाने चषक जिंकण्यात यश मिळविले. त्याच्या शार्कस संघात महाराष्ट्रासह, तामिळनाडू, केरळ, वेस्ट इंडिज, पुद्दुचेरी येथील खेळाडू सहभागी होते. अंकुरने शिवाजी विद्यापीठातून संगणकशास्त्रातून बीईचे शिक्षण पूर्ण केले आहे.

टॅग्स :Sangliसांगली