शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : लिफ्ट देऊन बिसूरच्या तरुणास लुटले, माधवनगरमधील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 14:44 IST

बिसूर (ता. मिरज) येथील विकास बाळासाहेब पाटील (वय ३०) यांना लिफ्ट देऊन दुचाकीस्वार चोरट्याने लुटले. त्यांच्याकडील १३ ग्रॅमची सोनसाखळी हातोहात लंपास केली. माधवनगर (ता. मिरज) येथील बंद पडलेल्या कॉटन मिलच्या आवारात सोमवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली.

ठळक मुद्दे लिफ्ट देऊन बिसूरच्या तरुणास लुटलेमाधवनगरमधील घटना 

सांगली : बिसूर (ता. मिरज) येथील विकास बाळासाहेब पाटील (वय ३०) यांना लिफ्ट देऊन दुचाकीस्वार चोरट्याने लुटले. त्यांच्याकडील १३ ग्रॅमची सोनसाखळी हातोहात लंपास केली. माधवनगर (ता. मिरज) येथील बंद पडलेल्या कॉटन मिलच्या आवारात सोमवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली.विकास पाटील पुण्यात नोकरीस आहेत. रविवारी रात्री कामानिमित्त गावी येण्यास निघाले होते. पहाटे ते सांगलीत आले. गावाकडे जाण्यास वाहन नसल्याने ते चालत कॉलेज कॉर्नरवर गेले. तेथून कोणते तरी वाहन मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. तेवढ्यात एका दुचाकीस्वार आला.

पाटील यांनी हात करताच दुचाकीस्वार थांबला. पाटील यांनी त्याला बिसूरला जाणार आहे, असे सांगितले. दुचाकीस्वाराने बसा म्हणून सांगितले. त्यामुळे पाटील दुचाकीवर बसले. माधवनगर सोडल्यानंतर दुचाकीस्वाराने दुचाकी थेट कॉटन मिलच्या गेटमधून आत घेतली.

मिलमधील झुडूपाजवळ नेऊन दुचाकी थांबविली. पाटील यांनी इकडे कुठे, असे म्हणताच दुचाकीस्वाराने तेथील दगड घेऊन मारहाण करण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे १३ ग्रॅमची साखळी काढून घेऊन पलायन केले. या घटनेनंतर पाटील यांनी संजयनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.बोगस नावकॉलेज कॉर्नर ते माधवनगरपर्यंत पाटील यांनी या दुचाकीस्वाराशी संवाद साधला. त्यावेळी त्याने महेश साबळे, असे स्वत:चे नाव सांगितले. पाटील यांनी फिर्यादीत संशयित म्हणून तेच नाव दिले आहे. साधारपणे हा चोरटा ३२ वर्षाचा आहे. अंधार असल्याने पाटील यांना त्याच्या दुचाकीचा क्रमांक पाहता आला नाही. पण पाटील यांनी दिलेल्या वर्णनावरुन त्याचा शोध सुरु आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcrimeगुन्हे