शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सांगली बाजार तेजीतच, कांद्याने गृहिणींच्या डोळ्यात आणले पाणी, पन्नाशी गाठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 18:44 IST

स्वयंपाकातील महत्वाचा घटक असलेला कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणण्याच्या तयारीत आहे. मुसळधार पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सांगली बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे प्रतिकिलो ५० रुपये दर झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. गवारी व पालेभाज्यांचा दर अजूनही तेजीतच आहे. कोथिंबिरीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. 

ठळक मुद्देगवारीचा, पालेभाज्यांचा दर तेजीतचकेवळ बटाटा स्वस्त, कोथिंबिरीची पेंडी आता दहा रुपयास केवळ बटाटा स्वस्त, बाजारात डाळींचाची आवक

सांगली : स्वयंपाकातील महत्वाचा घटक असलेला कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणण्याच्या तयारीत आहे. मुसळधार पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सांगली बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे प्रतिकिलो ५० रुपये दर झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. गवारी व पालेभाज्यांचा दर अजूनही तेजीतच आहे. कोथिंबिरीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. 

गेल्या दहा महिन्यापासून फळभाज्यांच्या दरात नेहमीच वाढ राहिली आहे. दीड महिन्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना शेतात माल काढताही आला नाही. त्याचा परिणाम बाजारावर झाला.

फळभाज्यांची बाजारात आवक कमी झाल्याने दरात वाढ होत गेली. सर्वच प्रकारच्या फळभाज्यांनी शंभरी ओलांडली होती. पण गेल्या पंधरा दिवसात दर थोडेसे कमी झाले आहेत. गवारी सोडली तर जवळपास सर्वच फळभाज्यांचे दर प्रतिकिलो ८० रुपयांच्या घरात गेले आहेत.

केवळ बटाटा स्वस्त आहे. दोन आठवड्यापूर्वी ४० रुपये दराने विकली जाणारी कोथिंबिरीची पेंडी आता दहा रुपयास विकली जात आहे. पालेभाज्या अजूनही महागच आहे. पालक, मेथी, तांदळ, लाल माठची पेंडी २० ते ३० रुपये दराने विक्री सुरु आहे.

टोमॅटोचा दर ४० रुपयांवरुन ८० रुपयांवर गेला आहे. बाजारात डाळींचाची आवक वाढली आहे. मोसंबी ६० रुपये, सीताफळ ७० रुपये व सफरचंदाची विक्री ८० रुपये किलो दराने होत आहे. केळीचा दर मात्र ३५ रुपये डझन स्थिर आहे.फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो)वांगी : ७० ते ८०भेनडी : ६० ते ७०हिरवी मिरची : ७० ते ८०टोमॅटो : ७० ते ८०पडवळ : ७० ते ८०भोपळा : २० रुपये नगदोडका : ८० ते ९०बटाटा : १५ ते २०कांदा : ४० ते ५०गवारी १०० ते ११०आले : ७० ते ८०कार्ली : ८० ते ९०ढबू मिरची : ६० ते ७०काकडी : ७० ते ८०कोबी : ७० ते ८० प्लॉवर : ७० ते ८०लूसण : ५० ते ६०हिरवा वाटाणा : १०० ते १२०गाजर : ७० ते ८०

 
टॅग्स :SangliसांगलीMIDCएमआयडीसी