शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेमुळे सांगली बँकेचे घोटाळे चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 05:14 IST

सुनावणीकडे लक्ष : जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांवर टांगती तलवार

सांगली : राज्य सहकारी बँकेच्या २५०० कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी माजी संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर, आता सांगली जिल्हा बँकेतील १५७ कोटी व सव्वादोन कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची प्रकरणे चर्चेत आली आहेत. या प्रकरणांवरही उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

आठ वर्षांपूर्वी जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नियुक्ती केली होती. बँकेच्या संचालक मंडळाच्या कालावधीत नियमबाह्य कर्जवाटपाची, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८३ नुसार चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत २१ संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप करून १५० कोटी व १७ संस्थांना एकरकमी कर्ज परतफेड योजनेतून ७ कोटी ९ लाखांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तत्कालीन चौकशी अधिकाऱ्यांनी घोटाळ्याप्रकरणी सात विद्यमान संचालक, ३६ माजी संचालक, ५० वारसदार आणि ७ अधिकारी अशा शंभर जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाच्या सुनावणीला माजी संचालकांनी आक्षेप घेत सहकारमंत्र्यांसमोर अपील केले होते. तत्कालीन सहकारमंत्र्यांसमोर चार वेळा सुनावणी होऊनही निर्णय घेतला नाही. त्यामुळे माजी संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात अजूनही सुनावणी सुरू आहे.

या प्रकरणी २३ आॅगस्टला सुनावणी होणार होती, मात्र न्यायपटलावर हे प्रकरण आले नाही. येत्या चार दिवसांत सुनावणीची पुढील तारीख निश्चित होणार आहे. राज्य बँकेच्या माजी संचालकांना न्यायालयीन निर्णयाने हादरा बसला असल्याने, जिल्हा बँकेच्या घोटाळा प्रकरणात सापडलेल्या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनाही धक्का बसला आहे.सर्वपक्षीय नेत्यांचा समावेशदोषारोपपत्र दाखल झालेल्या संचालकांमध्ये विद्यमान सात संचालक आहेत. यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी अशा सर्वच पक्षांतील नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे ही चिंता आता सर्वपक्षीयसुद्धा बनली आहे.सव्वादोन कोटींच्याप्रकरणात ७० जणसव्वादोन कोटींच्या घोटाळा प्रकरणात ७० जणांवर तत्कालीन चौकशी अधिकाऱ्यांनी आरोपपत्र ठेवले आहे. यामध्ये ४० माजी संचालक, तीन माजी कार्यकारी संचालक, ११ अधिकाºयांसह १६ वारसदार अशा ७० जणांचा समावेश आहे. न्यायालयात हे प्रकरण सुनावणीस आहे. दोन्ही प्रकरणांची वेगवेगळी सुनावणी सुरू आहे.

टॅग्स :Sangliसांगली