शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Sangli Bank Results : जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचाच डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 13:18 IST

सांगली : जिल्हा बँकेची निवडणूक दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत ...

सांगली : जिल्हा बँकेचीनिवडणूक दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह आमदार, पक्षांचे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्यात ठाण मांडून होते. बँकेवर प्रदीर्घ काळ जयंत पाटील यांची सत्ता आहे. यंदा मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविली. यानिवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. राष्ट्रवादीने ९, काँग्रेस ५, शिवसेना ३ तर भाजपने ४ जागेवर विजय मिळवला आहे. मिरजेच्या शेतकरी भवनात सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली होती. अखेर निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट होत राष्ट्रवादीने जिल्हा बँकेवरील आपली सत्ता कायम राखली आहे.यानिवडणुकीत कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जतमधून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सावंत हे मंत्री विश्वजित कदम यांचे मावसभाऊ आहेत. तर, केवळ ५ जागेवर कॉंग्रेसचा विजय झाला आहे. शिवसेनेत या निवडणुकीत ३ जागेवर यश संपादन केले आहे. तर भाजपने ४ जागा जिंकत जिल्हा बँकेच्या राजकारणात दमदार एंन्ट्री केली आहे.

जिल्हा बँकेसाठी यंदा चुरशीने ८५.३१ टक्के मतदान झाले होते. तर, एकवीसपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. १८ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात उतरले होते. महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल, तर भाजपचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात थेट लढत होती.

असे आहेत मतदारसंघ निहाय विजयी उमेदवारमिरज सोसायटी गटउमेदवार                                मिळालेली मतेविशाल पाटील (आघाडी)               ५२ विजयीउमेश पाटील (भाजप)                   १६

मिरज सोसायटी गटातून महाविकास आघाडीचे विशाल कदम विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार उमेश पाटील यांचा मोठा फरकाने पराभव केला आहे. आटपाडी सोसायटी गटउमेदवार                                  मिळालेली मतेतानाजी पाटील (आघाडी)                 ४० विजयीराजेंद्रअण्णा देशमुख (भाजप)              २९ आटपाडी सोसायटी गटातून आघाडीचे उमेदवार तानाजी पाटील यांनी राजेंद्रअण्णा देशमुख देशमुख यांचा पराभव केला आहे. तानाजी पाटील यांना ४० तर राजेंद्र अण्णा देशमुख यांना २९ मते मिळाली. कडेगाव सोसायटी गटउमेदवार                                 मिळालेली मतेमोहनराव कदम (आघाडी)                ५३ विजयीतुकाराम शिंदे (भाजप)                    ११

कडेगाव सोसायटी गटात मोहनराव कदम यांनी भाजप उमेदवाराला पराभवाची धूळ चारली आहे. मोहनराव कदम यांना ५३ तर तुकाराम शिंदे यांना केवळ ११ मते मिळाली. तासगाव सोसायटी गटउमेदवार                                           मिळालेली मतेबी. एस. पाटील (आघाडी)                       ४१ विजयीसुनील जाधव (भाजप)                            २३प्रताप पाटील (अपक्ष)                            १५तासगाव सोसायटी गटात आघाडीचे उमेदवार बी. एस. पाटील विजयी झाले. त्यांना ४१ मते मिळाली. तर विरोधी भाजपचे उमेदवार सुनिल जाधव यांना २३, अपक्ष उमेदवार प्रताप पाटील यांना १५ मते मिळाली. वाळवा सोसायटी गटउमेदवार                                       मिळालेली मतेदिलीपतात्या पाटील (आघाडी)                १०८ विजयीभानुदास मोटे (भाजप)                          २३

वाळवा सोसायटी गटात आघाडीचे उमेदवारदिलीपतात्या पाटील १०८ मते मिळवत विजयी झाले. त्यांनी भाजपचे भानुदास मोटे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मोटे यांना केवळ २३ मते मिळाली.

कवठेमंकाळ सोसायटी गट

उमेदवार                                  मिळालेली मतेअजितराव घोरपडे (आघाडी)              ५४ विजयीविठ्ठल पाटील (अपक्ष)                     १४कवठेमंकाळ सोसायटी गटात अजितराव घोरपडे यांनी अपक्ष उमेदवाराचा पराभव केला. घोरपडे यांना ५४ तर विरोधी अपक्ष उमेदवार ‌विठ्ठल पाटील यांना केवळ १४ मते मिळाली जत सोसायटी गटउमेदवार                                    मिळालेली मतेप्रकाश जमदाडे (भाजप)                    ४५ विजयीविक्रमसिंह सावंत (आघाडी)               ४०जत सोसायटी गटात भाजपचा विजय झाला आहे. भाजप उमेदवार प्रकाश जमदाडे यांनी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांना पराभवाचा धक्का दिला आहे. के‌वळ ५ मतांनी भाजप उमेदवार प्रकाश जमदाडे यांचा विजय झाला आहे.

महिला राखीव गटउमेदवार                                              मिळालेली मतेअ जयश्रीताई पाटील (आघाडी)                      १६८८ विजयीब अनिता सगरे (आघाडी)                            १४०८ विजयीसंगीता खोत (भाजप)                                 ५७९दीपाली पाटील (भाजप)                              ४०५

महिला राखीव गटात आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी विजयी पताका रोवली आहे. जयश्रीताई पाटील व अनिता सगरे यांनी भाजप उमेदवार संगीता खोत व दीपाली पाटील यांचा पराभव केला आहे.अनुसूचित जाती गटउमेदवार                                    मिळालेली मतेबाळासाहेब होनमोरे                          1503 विजयीरमेश साबळे भाजपचे                        548अनुसूचित जाती गटात महाआघाडीचे विद्यमान संचालक बाळासाहेब होनमोरे 1503-548 मतांनी विजयी. भाजपचे रमेश साबळे पराभूत.

सर्व विजयी उमेदवार१) विशाल पाटील   काँग्रेस/मिरज सोसायटी गट२) आ.मोहनराव कदम   काँग्रेस/कडेगाव सोसायटी गट३) महेंद्र लाड    काँग्रेस/पलूस सोसायटी गट (बिनविरोध)४) जयश्री मदन पाटील   काँग्रेस /महिला गट५) अनिता सगरे    राष्ट्रवादी/महिला गट६) दिलीप पाटील    राष्ट्रवादी/वाळवा सोसायटी गट७) आ.मानसिंगराव नाईक     राष्ट्रवादी/शिराळा सोसायटी गट (बिनविरोध)८) बी एस पाटील      राष्ट्रवादी/तासगाव सोसायटी गट९) प्रकाश जमदाडे      भाजपा/जत सोसायटी गट१०) तानाजी पाटील     शिवसेना/आटपाडी सोसायटी गट११) आ.अनिलभाऊ बाबर     शिवसेना/खानापूर सोसायटी गट (बिनविरोध)१२) अजितराव घोरपडे      शिवसेना/कवठेमहांकाळ सोसायटी गट१३) वैभव शिंदे      राष्ट्रवादी/पाणीसंस्था गट१४) मन्सूर खतीब      राष्ट्रवादी/ओबीसी गट१५) बाळासाहेब होनमोरे      राष्ट्रवादी /अनुसुचित जाती जमाती गट१६) राजेंद्र उर्फ चिमण डांगे     राष्ट्रवादी/भटक्या जमाती१७) सुरेश पाटील      राष्ट्रवादी/प्रक्रिया गट१८) पृथ्वीराज पाटील     काँग्रेस/पतसंस्था१९) राहुल महाडिक     भाजपा/पतसंस्था२०) संग्रामसिह देशमुख    भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट२१) संग्रामससिंह देशमुख     भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट

टॅग्स :SangliसांगलीbankबँकElectionनिवडणूक