शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मराठा उमेदवार नियुक्तीवरुन अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 16:02 IST

सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मराठा आरक्षणातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत नसल्याच्या कारणावरुन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. संगणक, कपाट खरेदीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे शिक्षण विभागातील दीड कोटी रुपयांच्या खरेदीबाबत साशंकता निर्माण झाली होती.

ठळक मुद्देजिल्हा परिषद स्थायी समिती सभाशिक्षण समितीच्या दीड कोटी खर्चावर शिक्कामोर्तब

सांगली : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मराठा आरक्षणातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत नसल्याच्या कारणावरुन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

संगणक, कपाट खरेदीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे शिक्षण विभागातील दीड कोटी रुपयांच्या खरेदीबाबत साशंकता निर्माण झाली होती. संगणक, कपाटासह एलसीडी प्रोजेक्टर खरेदीवर स्थायी समितीत शिक्कामोर्तब करण्यात आले. दर्जाचे संगणक आणि सदस्यांना विश्वासात घेऊन कपाट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आली. यावेळी सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मनगौडा रवी, ब्रम्हानंद पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आदी उपस्थित होते.शिक्षण विभागातील संगणक आणि कपाट खरेदीला सर्वसाधारण सभेत आक्षेप घेण्यात आला होता. आधी शाळांना वीज द्या, मग संगणक खरेदी करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. कपाटाच्या खरेदीबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती, त्यामुळे शिक्षणमधील संगणक आणि कपाट खरेदीची मंजुरी प्रलंबित ठेवण्यात आली.

स्थायीमध्ये शिक्षणच्या खरेदीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ७० लाख रुपयांची संगणक खरेदी करताना पारदर्शीपणे करण्याची मागणी गटनेते सत्यजित देशमुख यांनी केली. चांगल्या दर्जाचे ब्रॅण्डेड कंपनीचे संगणक घेतले जाणार आहेत. प्रत्येक संगणकामागे पुरवठादाराची अनामत ठेवली जाईल.

तांत्रिक तपासणी अहवालानंतरच खरेदी केली जाणार आहे. चाळीस लाख रुपयांची कपाट खरेदी करताना मुख्याध्यापक आणि सदस्यांशी चर्चा करण्यात यावी. शाळेला कपाटाची गरज असेल तर, खरेदी करण्यात यावी. ३९ लाख रुपयांच्या एलईडी प्रोजेक्टर खरेदीलाही मंजुरी देण्यात आली.मराठा आरक्षणातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत नसल्याच्या कारणावरुन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. एकोणीस उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे. पाणीपुरवठा विभागाने कर्मचारी नियुक्तीची कार्यवाही केली आहे, मात्र अन्य विभागांकडून करण्यात आली नसल्याच्या कारणावरुन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावे, असे आदेश अध्यक्ष देशमुख यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीने बांधकाम विभागासाठी पस्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, पंरतु या निधीतून कामे पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे ६० कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे.अधिकाऱ्यांना यापूर्वी सूचना देऊनही निधी शिल्लक आहे. दोन महिन्यात शंभर टक्के निधी खर्चासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या बैठकीला डी. के. पाटील, अर्जुन पाटील, संभाजी कचरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद