शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : तुंग येथे मगरीचा तरूणावर हल्ला, पायाला गंभीर दुखापत : जीव वाचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:33 IST

तुंग (ता. मिरज) येथे सोमवारी सकाळी कृष्णा नदीत एका मच्छीमार तरूणावर मगरीने हल्ला केला. महादेव तुकाराम मोरे (वय ५२) असे तरुणाचे नाव आहे. मगरीच्या हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने आरडा ओरडा केल्याने मगरीने पाय सोडला आणि त्याचा जीव वाचला.

ठळक मुद्दे तुंग येथे मगरीचा तरूणावर हल्लापायाला गंभीर दुखापत : जीव वाचला

सांगली : तुंग (ता. मिरज) येथे सोमवारी सकाळी कृष्णा नदीत एका मच्छीमार तरूणावर मगरीने हल्ला केला. महादेव तुकाराम मोरे (वय ५२) असे तरुणाचे नाव आहे. मगरीच्या हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने आरडा ओरडा केल्याने मगरीने पाय सोडला आणि त्याचा जीव वाचला.तुंग येथील कृष्णा नदीत मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. यापूर्वीही या परिसरात मगरीने अनेकांच्यावर हल्ले केले आहेत. महादेव मोरे हे मच्छीमारीचा व्यवसाय करतात. रविवारी सायंकाळी त्यांनी मासे पकडण्यासाठी नदीपात्रात जाळे टाकले होते सोमवारी सकाळी ते जाळे काढण्यासाठी नदीत उतरले.

जाळे घेऊन नदीकाठी परतत असताना अचानक मगरीने त्यांचा पाय पकडला. मगरीने हल्ला केल्याचे लक्षात येताच महादेव मोरे यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या आरडाओरडमुळे मगरीने त्यांचा पाय सोडून देऊन नदीत पलायन केले.

मगरीने त्यांच्या पायाला जोरात चावा घेतला असुन पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेतच ते पोहत नदीपात्राबाहेर आले. त्यांना तुंग येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गेल्याच महिन्यात ब्राह्मनाळ येथे लहान मुलाला मगरीने ओढून नेले होते दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला होता कृष्णा नदीकाठ परिसरात मगरीची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांच्यातून होत आहे

टॅग्स :Sangliसांगलीforestजंगलfishermanमच्छीमार