शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : अजमेर एक्स्प्रेसमध्ये प्रवासी महिलेची प्रसुती, पोलिसांची मदत, सिव्हिलमध्ये उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 11:16 IST

बेंगलोर-अजमेर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेची प्रसुती रेल्वेतच झाली. मिरज स्थानकात रेल्वे पोलिस, प्रवासी महिला डॉक्टर व प्रवासी महिलांच्या मदतीने जनरल बोगीत या महिलेची सुखरुप प्रसुती होऊन पुत्ररत्न झाले. या महिलेच्या प्रसुतीसाठी अजमेर एक्स्प्रेस अर्धा तास विलंबाने रवाना झाली.

ठळक मुद्देमिरज स्थानकात जनरल बोगीत महिलेची सुखरुप प्रसुती रेल्वे पोलिस, प्रवासी महिला डॉक्टर, प्रवासी महिलांनी केली मदतप्रसुती होईपर्यंत अजमेर एक्स्प्रेस मिरज स्थानकात थांबविण्यात आली

मिरज : बेंगलोर-अजमेर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेची प्रसुती रेल्वेतच झाली. मिरज स्थानकात रेल्वे पोलिस, प्रवासी महिला डॉक्टर व प्रवासी महिलांच्या मदतीने जनरल बोगीत या महिलेची सुखरुप प्रसुती होऊन पुत्ररत्न झाले. या महिलेच्या प्रसुतीसाठी अजमेर एक्स्प्रेस अर्धा तास विलंबाने रवाना झाली.बेंगलोर येथे मजुरी करणारा एक गुजराती तरुण २० वर्षीय नऊ महिन्याच्या गर्भवती पत्नीस प्रसुतीसाठी अजमेर एक्स्प्रेसने गावी घेऊन जात होता. आतीबेन राकेश रमेश (रा. बडोदा) या महिलेस मिरज स्थानकात एक्स्प्रेस थांबल्यानंतर प्रसुती वेदना सुरू झाल्या. प्रवाशांनी रेल्वे पोलिस व सुरक्षा दलाला माहिती दिल्यानंतर महिला पोलिसांनी या गर्भवती महिलेची मदत केली.

वैद्यकीय मदतीसाठी ध्वनिक्षेपकावरून आवाहन केल्यानंतर एक प्रवासी महिला डॉक्टर मदतीसाठी आली. प्रसुती होईपर्यंत रेल्वेच्या महिला डॉक्टरही धावतपळत आल्या. सर्वांच्या मदतीने महिलेची सुखरुप प्रसुती होऊन पुत्ररत्न झाले.रेल्वे पोलिसांनी माता व बालकास पुढील उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रसुती होईपर्यंत अजमेर एक्स्प्रेस मिरज स्थानकात थांबविण्यात आली होती. त्यामुळे एक्स्प्रेस अर्धा तास विलंबाने पुण्याकडे रवाना झाली. महिलेचा पती राकेश रमेश याने मदतीबद्दल रेल्वे अधिकारी व पोलिसांचे आभार मानले..

 

टॅग्स :SangliसांगलीRailway Passengerरेल्वे प्रवासी