शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : सीसीटीव्हीसाठी चार मंडळाकडून २५ हजाराची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 14:11 IST

सांगली शहराच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाला फाटा देऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनास सांगलीतील चार गणेश मंडळासह नवरात्र उत्सव मंडळाने प्रतिसाद देत २५ हजार रुपयांची रक्कम जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे सुपुर्द केली.

ठळक मुद्देसीसीटीव्हीसाठी चार मंडळाकडून २५ हजाराची मदतसांगली पोलिस अधिक्षकांकडे निधी सुपुर्द

सांगली : शहराच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाला फाटा देऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनास सांगलीतील चार गणेश मंडळासह नवरात्र उत्सव मंडळाने प्रतिसाद देत २५ हजार रुपयांची रक्कम जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे सुपुर्द केली.यंदाही ध्वनिक्षेपकाच्या दणदणाटाने होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. ध्वनिक्षेपकावर खर्च होणारे पैसे विधायक कामांसाठी खर्च करावेत, अशी पोलीस यंत्रणेची भूमिका होती. सध्या सांगली, मिरज व कुपवाड शहरात ८० सीसीटीव्ही कॅमेरे काम करीत आहेत.

या सीसी टीव्हीच्या माध्यमातून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. अद्यापही काही भागात सीसी टीव्ही नाहीत. त्यासाठी मंडळांनी पुढाकार घेऊन सीसी टीव्ही बसविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास मंडळांचा प्रतिसाद मिळाला आहे.सांगलीतील कलानगरच्या जयमहाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाने तीन हजार, ओमगणेश कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळाने दहा हजार, खणभागातील विजय चौक नवरात्र मंडळाने ५ हजार, गोल्डन क्लब गणेश मंडळाने ७ हजार असे एकूण २५ हजारांची रक्कम पोलिसप्रमुखांकडे सुपुर्द केली.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे, एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, गुंडाविरोधी पथकाचे संतोष डोके, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीSangliसांगलीPoliceपोलिस